एक्स्प्लोर
भाजपच्या आरोपांवर काँग्रेसचा पलटवार; चिनी कंपन्यांनी पीएम केअर्स फंडला कोट्यवधींचा निधी दिला का? : बाळासाहेब थोरात
भारत-चीन सीमा वादावरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसला काही प्रश्न विचारत आरोप केले आहेत. भाजपच्या आरोपांवर काँग्रेसने पलटवार केला असून चीनी कंपन्यांनी पीएम केअर्स फंडला कोट्यवधींचा निधी दिला का? आणि दिला असेल तर त्याचा हिशोब काय? असा प्रश्न महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विचारला आहे.
संगमनेर : भारत-चीन सीमावादावरुन आता भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरोपांनंतर राजीव गांधी फाउंडेशनच्या निधीवरुन भाजपने काही प्रश्न उपस्थित करत काँग्रेसवर आरोप केले होते. यावर आता काँग्रसने देखील पलटवार केला आहे. चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी करुन गलवान खोरे, पेंगॉग तलाव परिसर, हॉटस्प्रिंग व वाय जंक्शन भागात लष्कराची जमवाजमव केली आहे. चीनी सैन्याच्या आगळीकीमुळे आपले 20 जवान शहीद झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून चीन सीमेवर तणाव असताना अनेक चीनी कंपन्यांनी पंतप्रधान केअर्स फंडाला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीन यांचे नेमके काय साटेलोटे आहे? याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
संगमनेर येथे पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले की, ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर झोपाळ्यावर बसून चहा पित होते. त्यावेळी चीनने पाँईंट 30 आर पोस्ट चुमार, लडाखमध्ये अतिक्रमण करायला सुरुवात केली होती. त्यापूर्वीही 2017 मध्ये चीनने डोकलाममध्ये घुसखोरी केलीच होती. चीन सीमेवर आपले 20 जवान शहीद होऊनही मोदी सरकार मात्र अजूनही आपल्या भ्रामक विश्वातून बाहेर यायला तयार नाही. चीनने कधीही भारतीय हद्दीत घुसखोरी केली नाही किंवा कोणताही प्रदेश ताब्यात घेतला नाही, असा दावा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाची दिशाभूल करुन चिनला पोषक अशी भाषा बोलत आहेत. हे देशासाठी सर्वात घातक आहे. राहुल गांधी यांनी याबाबत वारंवार सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. पण सरकारने त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. चीनने भारताच्या चार भागात घुसखोरी करुन जमीन बळकावण्यावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले तेव्हा मोदी सरकार व भाजपाने या विषयांना बगल देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. जबाबदार विरोधी पक्ष म्हणून देशाचे हित लक्षात घेऊन काँग्रेस पक्ष हे प्रश्न वारंवार उपस्थित करेल. हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. आपल्या सरकारचे अपयश झाकण्यासाठी ते प्रश्नांपासून पळ काढत आहेत.
चीनने स्वतःची जबाबदारी ओळखून एलएसीच्या त्यांच्याकडील बाजूला जावं : भारतीय राजदूत विक्रम मिसरी
काँग्रेस पक्षाचे केंद्र सरकारला प्रश्न
- 2013 मध्ये चीनने सीमेवर कुरापती केल्या असतानाही पंतप्रधान मोदी यांनी चीनच्या कंपन्यांकडून निधी का घेतला?
- चीनची वादग्रस्त कंपनी HUAWEI कडून पंतप्रधानांनी सात कोटी रुपये घेतले का? या कंपनीचे चीनचे लष्कर
- पीपल्स लिबरेशन आर्मीशी संबंध आहेत का?
- चीनच्या TIKTOK कंपनीने पीएम केअर फंडात 30 कोटींची देणगी दिला आहे का?
- पेटीएमने याच पीएम केअर फंडात 100 कोटी दिले आहेत का?
- XIAOMI या कंपनीने याच फंडात 15 कोटी दिले आहेत का?
- OPPO कंपनीने पीएम केअरमध्ये 1 कोटी दिलेत का?
- मोदींनी पंतप्रधान नॅशनल रिलीफ फंडातील देणग्या पीएम केअर फंडात वळवल्या आहेत का?
- राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून पैसे का मिळाले?
- कॉंग्रेस सरकारमध्ये चीनबरोबर व्यापार का वाढला?
- लक्झमबर्गकडून राजीव गांधी फाउंडेशनला पैसे का मिळाले?
- पंतप्रधानांची राष्ट्रीय सहाय्यता निधी जनतेची जो जनतेला सेवा आणि मदतीसाठी आहे, यातून राजीव गांधी फाउंडेशनला 2005-08 पर्यंत पैसे का मिळाले? देशातील जनतेला याचं उत्तर जाणून घ्यायचे आहे. देशातील जनतेने त्यात कष्टाने पैसे दिलेत.
- यूपीएच्या काळात राजीव गांधी फाउंडेशनला पैसे देण्यासाठी अनेक केंद्रीय मंत्रालये, सेल, गेल, एसबीआय यावर दबाव आणला गेला. एका खासगी संस्थेकडे पैसे पाठवण्याचे काम का केले गेले? यामागील कारण काय होते?
- या फाउंडेशनमध्ये कॉर्पोरेटकडून मोठा निधी घेण्यात आला. मोठ्या निधीच्या बदल्यात कंत्राटं देण्यात आली. असं का झालं?
- पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीचे ऑडिटर कोण आहेत? ठाकूर वैद्यनाथन आणि अय्यर कंपनी ऑडिटर होती. रामेश्वर ठाकूर हे त्याचे संस्थापक होते. ते राज्यसभेचे खासदार होते आणि चार राज्यांचे राज्यपाल होते. अनेक वर्ष ते ऑडिटर होते. अशा लोकांना अशा प्रकारचे कंत्राट देऊन सरकार काय करण्याचा प्रयत्न करत होतं?
- राजीव गांधी फाऊंडेशनला जवाहर भवनच्या नावावर कोट्यवधींची जमीन लीजवर कशी दिली गेली? राजीव गांधी फाऊंडेशनची खाती कॅग ऑडिटला का नकार देत आहेत? त्यांचे ऑडिट का झाले नाही? यासाठी आरटीआय का लागू झाला नाही?
- या फाऊंडेशनने पैसे तर घेतल पण देण्याचंही काम केलं. राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टला ही देणगी कशी दिली गेली हे जाणून घ्यायचे आहे.
- मेहुल चोकसीने राजीव गांधी फाउंडेशनकडून पैसे का घेतले? मेहुल चोकसी याचा काय संबंध आहे? मेहुल चोकसीला तुम्ही कर्ज का दिले? मेहुल चोकसीचा राजीव गांधी फाऊंडेशनशी काय संबंध आहे, हे देशाला जाणून घ्यायचे आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
बातम्या
बातम्या
बीड
Advertisement