एक्स्प्लोर

चीनने स्वतःची जबाबदारी ओळखून एलएसीच्या त्यांच्याकडील बाजूला जावं : भारतीय राजदूत विक्रम मिसरी

दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी चीनने स्वतःची जबाबदारी ओळखून एलएसीच्या त्यांच्याकडील बाजूला गेलं पाहिजे, असं विधान चीन मधील भारतीय राजदूत विक्रम मिसरी यांनी केलं आहे. तर दुसरीकडे चीनकडून पुन्हा सीमेवर सैन्याची जमवाजमव झाल्याची माहिती उघड झाली आहे.

नवी दिल्ली : चीनने तणाव कमी करण्याची स्वतःची जबाबदारी ओळखून एलएसीच्या त्यांच्याकडील बाजूला गेलं पाहिजे, असं विधान चीनमधील भारताचे राजदूत विक्रम मिसरी यांनी केलं आहे. याचा अर्थ चीनने भारतभूमीत अतिक्रमण केलं आहे, याची एकप्रकारे कबुलीचं मिसरी यांनी दिली आहे. भारत-चीन सीमावाद मिटवण्यासाठी चीनने LAC जवळील नवीन बांधकाम थांबवावे, असंही मिसरी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले आहे. यानंतर चीन कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे आहे.

सीमावाद मिटवण्यासाठी चीननं बांधकाम थांबवावं चीन-भारत सीमावादाच्या पार्श्वभूमीवर चीनमधील भारतीय राजदूत विक्रम मिसरी यांनी महत्वाची माहिती पीटीआयला दिली आहे. सीमावाद मिटवायचा असेल तर एलएसी जवळील बांधकाम चीनने थांबवावे, असा सल्ला राजदूत मिसरी यांनी दिलाय. सोबतचं चीनने स्वतःची जबाबदारी ओळखून एलएसीच्या त्यांच्याकडील बाजूला गेलं पाहिजे, असंही म्हटलं आहे. हे विधान अशासाठी महत्वाचं आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात घुसखोरी झाली नसल्याचं सांगितलं होतं.

चीनवर नजर ठेवण्यासाठी अमेरिका आपलं सैन्य आशियात दाखल करणार? चीनकडून पुन्हा सीमेवर सैन्याची जमवाजमव भारत-चीन सीमेवरील ताण अजूनही कमी होताना दिसत नाही. आजचं चीनने पुन्हा भारतीय सीमेवर केलेली सैन्याची जमवाजमव हा कराराचा भंग असल्याचा आरोप भारताने केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात भारताने हा चीनच्या सीमेवरील सैन्याच्या आणि शस्त्रास्त्रांच्या जमवाजमवीला हरकत घेतली आहे. मागच्याच आठवड्यातील हिंसक झटापटीत 20 भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनैतिक स्तरावर अनेक चर्चा झाल्या. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव निवळत आहे, असं वाटत असतानाच चीनने पुन्हा सीमेपलीकडे सैन्याची आणि युद्धसाहित्याची आवक वाढवली आहे.

रॉयटरने दिलेल्या वृत्तानुसार त्यांनी मिळवलेल्या उपग्रहाने काढलेल्या या परिसराच्या फोटोनुसार, चीनने या परिसरात एक तळ उभारला आहे. चीनी सैन्याचा हा तळ गलवान खोऱ्यात जिथे भारत आणि चीन यांच्यात चकमक झाली त्याच ठिकाणी असल्याचं स्पष्ट दिसतं. उपग्रहातून घेतलेल्या छायाचित्रात काही तंबू दिसतात, त्याखाली काही बांधकाम सुरु असावं असा संशय रॉयटरच्या बातमीत व्यक्त करण्यात आला आहे. कारण या सॅटेलाईटद्वारे काढलेल्या या चित्रात बांधकामाच्या ठिकाणी असतात तशा भिंती आणि बॅरिकेट्स असल्याचंही दिसत असल्याचं बातमीत म्हटलं आहे.

Jammu & Kashmir | जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये सीआरपीएफ पथकावर हल्ला; एक जवान शहीद

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Embed widget