एक्स्प्लोर
औरंगाबादमध्ये ट्रेनखाली येऊनही चिमुकल्याचा जीव वाचला
![औरंगाबादमध्ये ट्रेनखाली येऊनही चिमुकल्याचा जीव वाचला Aurangabad Train Goes Missing Survives Childs Life Latest Update औरंगाबादमध्ये ट्रेनखाली येऊनही चिमुकल्याचा जीव वाचला](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/08173208/aur-train-accident-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
औरंगाबाद : 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीची प्रचिती औरंगाबाद रेल्वे स्थानकावर पाहायला मिळाली. धावत्या ट्रेनमधून पडलेला तीन वर्षाचा चिमुरडा रेल्वे खाली येऊनही बचावला. रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही सर्व घटना कैद झाली आहे.
औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर आज सकाळीच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून मनमाड-काचिगुडा पॅसेंजर रवाना झाली. यावेळी काही प्रवासी धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते. त्यातील एका प्रवाशानं तीन वर्षीय चिमुरड्याला चढवलं आणि नंतर स्वत: चढण्याचा प्रयत्न करु लागला. मात्र डब्यातील वाढलेल्या गर्दीमुळे सर्व प्रवासी बाहेर फेकले गेले.
बाहेर फेकल्या गेलेले प्रवासी फटलावर पडले. तर ट्रेनमध्ये चढलेला तो चिमुरडा ट्रेनखाली आला. दुर्घटनेनंतर रेल्वे तात्काळ थांबवण्यात आली, आणि चिमुरड्याला सुखरुप बाहेर काढण्यात आलं.
दरम्यान, मंगळवारी (3 जुलै रोजी) मुंबईतील बोरिवली स्टेशनवर धावत ट्रेन पकडणाऱ्या तरुणाचा ट्रेनखाली येऊन मृत्यू झाला. या घटनेचा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पिण्याच्या पाण्याची बॉटल घेण्यासाठी तो बोरिवली स्टेशनमध्ये उतरला होता. बॉटल विकत घेऊन, त्याने दुकानदाराला 100 रुपयांची नोट दिली.
मात्र ट्रेन सुटल्याचं लक्षात येताच त्यानं धावत ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला. एका हातात पाण्याची बॉटल आणि दुसऱ्या हातात सुट्टे पैसे असल्यानं त्याचा तोल जाऊन तो रेल्वेखाली आला.
सीसीटीव्ही व्हिडीओ पाहा
संबंधित बातम्या
CCTV : धावती ट्रेन पकडताना तोल गेल्यानं प्रवासी ट्रेनखाली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
टेक-गॅजेट
व्यापार-उद्योग
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)