कोई बोले राम राम कोई खुदाए... ! अमृता फडणवीसांचे नवे गाणे रिलीज, गुरुदेव भजन गात दिला सर्वधर्म समभावाचा संदेश
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचं नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे.
Amruta Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचं नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. अमृता फडणवीस यांचं 'कोई बोले राम राम कोई खुदाए' हे नवीन हिंदी गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. टी-सीरिजच्या बॅनरखाली हे नवं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. अमृता फडणवीस यांचं गाणं रिलीज होताच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra CM Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) बँकर असण्यासोबतच गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्याही आहेत. त्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय असतात आणि त्याच्या आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आता अमृत फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. टी-सीरीजने त्यांच्या अधिकृत यु-ट्युब चॅनलवर अमृता फडणवीस यांचं 'कोई बोले राम राम' गाणं रिलीज केलं आहे.
महाशिवरात्रीच्या मुहूर्तावरही अमृता फडणवीसांनी स्वत: लिहलं होतं गाणं
महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) मुहूर्तावर शिवभक्तांकडून देवा दी देव महादेव यांची पूजा अर्चना केली जात असते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर स्वत: गाणं लिहिलं आहे. देवाधीदेव तू महादेव, तू तो सांब सदाशिव.. या शब्दांनी रचलेलं हे गीत मुख्यमंत्र्यांनी युट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन शेअर केलं आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि अमृता फडणवीस यांनी हे गीत गायलं होतं.
अमृता फडणवीस यांच्या विविध भूमिका
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस. विविध सामाजिक उपक्रम आणि त्यांच्या गाण्याच्या शैलीमुळे त्यांचे अनेक चाहते आहेत. सोशल मीडियावरील बहुचर्चित स्टार्सपैकी त्या एक आहेत. सामाजिक कार्यकर्त्या, बँकर, गायिका आणि अभिनेत्री अशा विविध भूमिका पार पाडत आहेत. अमृता फडणवीस या गेल्या 17 वर्षांहून अधिक काळ ॲक्सिस बँकेत कार्यरत आहेत. 2003 मध्ये त्यांनी या प्रथितयश बँकेमध्ये एक्झिक्युटिव्ह कॅशियर म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्याच बँकेच्या नागपुरातील व्यवसाय शाखेचे प्रमुख म्हणून काम पाहिले. यासोबतच, व्हाईस प्रेसिडेंट - ट्रान्झॅक्शन बँकिंग विभाग हे पदही त्यांनी सांभाळले आहे. जानेवारी 2015 मध्ये त्यांना याच बँकेच्या वरळी, मुंबई येथील कॉर्पोरेट कार्यालयात नियुक्त करण्यात आले होते. सध्या त्या याच बँकेच्या उपाध्यक्षपद म्हणून काम करत आहेत.
























