एक्स्प्लोर

Maharashtra Weather : महाराष्ट्रात गारठा कायम राहणार? हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो, वाचा सविस्तर

IMD Rain & Cold Weather Update : पुढील दोन दिवसांत राज्यात उत्तर आणि मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यातही तापमानात किंचित घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Maharashtra Weather Today : पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील तापमानात घट (Weather Update) होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तापमानात घट (Cold Weather) होण्याचा अंदाज आयएमडीने (IMD) वर्तवला आहे. उत्तर भारतासह राज्यात सर्वत्र थंडीची लाट (Cold Wave) पसरली आहे. पुढील दोन दिवसांत राज्यात उत्तर आणि मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यातही तापमानात किंचित घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता

भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान उत्तर भारताच्या काही भागांमध्ये, मध्य भारताच्या काही भागांसह उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये किमान तापमानात थोडीशी घट होण्याची शक्यता आहे. पुणे, अहमदनगर, सातारा, जळगावसह मुंबईमध्ये किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. देशासह राज्यातील तापमानात मोठी घट झाली आहे. गेल्या काही दिवसात कोकणात किमान तापमानात मोठी घट झाली आहे. मुंबईतील तापमानात देखील कमालीची घट पाहायला मिळत आहे. 

महाराष्ट्रात गारठा कायम राहणार

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवस राज्यात थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 1 फेब्रुवारीपर्यंत राज्यात गारठा वाढणार आहे. त्यानंतर तापमानात एक ते दोन अंशांना वाढ होण्याचा अंदाज आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सर्वत्र थंड हवामान कायम राहील.

येत्या आठवड्यात तीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होणार

भारतीय हवामान खात्याने म्हटलं आहे की, पुढील आठवड्यात तीन वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम वायव्य भारतावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशाच्या हवामानावर परिणाम होईल. आज जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागात बुधवारी गारपीट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पंजाब, चंदीगड, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये बुधवारी आणि गुरुवारी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

देशातील हवामान कसं आहे?

नवी दिल्ली आणि उत्तर भारतातील अनेक भागात धुक्याचा दाट थर पसरला आहे, यामुळे दृश्यमानतेवर परिणाम झाला आहे. दाट धुक्यामुळे विमान प्रवास आणि रेल्वे उशिराने सुरु आहे. बुधवार आणि गुरुवारी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांमध्ये सकाळच्या वेळी दाट धुके असण्याची शक्यता आहे. 4 फेब्रुवारीपर्यंत जम्मू, काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यांसारख्या डोंगराळ प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज आयएमडीने दिला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget