एक्स्प्लोर
Advertisement
कावळेसाद दुर्घटना: मृतदेह काढण्याचं आव्हान, आता रोप वेचाचा पर्याय
आंबोलीच्या कावळेसाद धबधब्यात अडकलेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्याचं शर्थीचं काम अद्याप सुरुच आहे. आजचा चौथा दिवस आहे.
सिंधुदुर्ग: आंबोलीच्या कावळेसाद धबधब्यात अडकलेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्याचं शर्थीचं काम अद्याप सुरुच आहे. आजचा चौथा दिवस आहे.
पाण्याच्या प्रवाहाने एक मृतदेह वाहून गेलाय, तर दुसरा मृतदेह धबधब्याच्या दगडात अडकला आहे.
जो मृतदेह वाहून गेला आहे, त्याचा शोध घेण्यासाठी विरुद्ध दिशेने काही शोधपथकं पाण्यातून येत आहेत. तर दुसा मृतदेह बाहेर काढण्यासाठी अनेक आडाके बांधले जात आहेत.
आंबोलीजवळच्या कावळेसाद पॉईंटवर नेमकं काय घडलं?
स्थानिक प्रशासनाची साथ मिळत नसल्यानं शोधमोहिमेत सहभागी झालेल्या कोल्हापुरातील खाजगी गिर्यारोहकांनी शोधमोहिम थांबवली. मात्र आज स्थानिक अल्मेडा टीम मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न करणार आहे.
दारुच्या नशेत दोघे कोसळले
आंबोली कावळेसाद इथे दारूच्या नशेत सोमवारी संध्याकाळी प्रताप राठोड आणि इम्रान गार्दी हे दोघे युवक 600 फूट खोल दरीत कोसळून त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताचा थरारक व्हिडीओ उघड झाल्यानंतर, प्रकरणाचं सत्य समोर आलं.
मृतदेह बाहेर काढण्याचं शर्थीचं काम
गेल्या चार दिवसांपासून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. मात्र पाऊस आणि वाऱ्यामुळे या कामात अडथळे निर्माण होत आहेत.
गेले तीन दिवस समिट ॲडव्हेन्चर, हिल रायडर्स ग्रुप, मलय ॲडव्हेन्चर, ham रेडिओ या एकूण 20 जणांची टिम शोधकाम करत होत्या. मात्र या टिम रिकाम्या हाती कोल्हापूरला परतल्या.
आता स्थानिक बाबल अल्मेडा आणि त्यांचे सहकारी ही शोध मोहिम करत आहेत.
मृतदेह बाहेर काढण्यास अडथळे
मृतदेह तब्बल 600 फूट खाली कोसळल्यामुळे तिथवंर जायचं कसं, हाच मोठा प्रश्न शोधकर्त्यांना आहे. कावळेसादपासून गोल फिरून शिरसिंगे या गावाला 16 किमीचा वळसा घालून तिथवर पायी पोहोचण्याचा पर्याय होता. मात्र पाऊस, पायवाट, निसरडा रस्ता, सोसाट्याचा वारा त्यामुळे इथवर पोहोचणं कठीण काम आहे.
रोप लावून खाली उतरणे
आज शोध आणि बचावकार्य करणाऱ्या पथकांनी थेट रोप वे लावून खाली उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पण हे कामही महाकठीण आहे.
त्यामुळे शोध आणि बचाव पथकांसमोर मृतदेह बाहेर काढण्याच मोठं आव्हान आहे.
VIDEO -
संबंधित बातम्या
आंबोलीजवळच्या कावळेसाद पॉईंटवर नेमकं काय घडलं?
VIDEO : सेल्फी नव्हे, दारुच्या नशेत तरुणांचा दरीत कोसळून मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement