एक्स्प्लोर
Advertisement
अकोल्यातील बेपत्ता बिल्डर सहकुटुंब गोव्यात सापडले
अकोला: अकोल्यातील बेपत्ता बिल्डर अमित वाघ आणि त्यांच्या कुटुंबाचा पत्ता अखेर लागला आहे. वाघ कुटुंब गोव्यात एका हॉटेलमध्ये सुखरुप असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या 15 दिवसांपासून वाघ कुटुंब बेपत्ता होतं.
अमित वाघ हे साताऱ्याला सासुरवाडीला गेले होते. मात्र 13 जूनच्या रात्रीपासून कुटुंबीयांसह त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता.
अमित वाघ, त्यांची पत्नी प्रियंका आणि शाश्वत आणि स्पंदन या दोन मुलांचा सातारा पोलिस शोध घेत होते.
वाघ कुटुंब अकोल्यातील खडकी इथल्या संतोषनगर परिसरात राहतं. वाघ यांचे अकोल्यातील गोरक्षण रोड, मलकापूर, तुकाराम हॉस्पिटल चौकामध्ये मोठ-मोठी अपार्टमेंटचे बांधकाम सुरु आहे. तर काही बांधकामं पूर्णत्वास गेली आहेत.
वाघ कुटुंब अशाप्रकारचे अचानक बेपत्ता झाल्याने विविध तर्कवितर्क लावले जात होते. त्यांच्या बेपत्ता होण्यामागे बांधकाम व्यवसायातील स्पर्धा कारणीभूत असल्याची चर्चा होती.
अमित वाघ यांचा भागीदारीमध्ये बांधकाम व्यवसाय होता. भागीदारी अडचणीत आल्यामुळे वाघ यांनी स्वतंत्रपणे बांधकाम व्यवसाय उभारण्याचे प्रयत्न केले होते, अशी माहिती आहे.
संबंधित बातम्या
अकोल्यातील प्रसिद्ध बिल्डर 15 दिवसांपासून सहकुटुंब बेपत्ता
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
सोलापूर
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement