एक्स्प्लोर

मी सत्याच्या बाजूनं, महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही; अजितदादांची स्पष्टोक्ती, टीकेची झोड उठलेल्या चाकणकरांवर कारवाई होणार?

Ajit Pawar on Rupali Chakankar: युवतीच्या कुटुंबीयांशी अजित पवार यांनी रूपाली ठोंबरे यांच्या फोनवरून संवाद साधला. यावेळी बोलताना या न्यायाच्या लढाईमध्ये मी तुमच्यासोबत असल्याचे अजित पवार यांनी सांगितलं.

Ajit Pawar on Rupali Chakankar: राज्य महिला आयोगासारख्या घटनात्मक पदावर असूनही रूपाली चाकणकर यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून अत्यंत बेजबाबदारपणे वक्तव्य केली जात असल्याची सडकून टीका विरोधकांकडून होत आहे. फलटणमधील डॉक्टर युवतीने केलेल्या आत्महत्येनंतर रुपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर संतापाची लाट असल्याचे चित्र आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रूपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्यांशी सहमत नसल्याचे म्हटले आहे. आज युवतीच्या कुटुंबीयांशी अजित पवार यांनी रूपाली ठोंबरे यांच्या फोनवरून संवाद साधला. यावेळी बोलताना या न्यायाच्या लढाईमध्ये मी तुमच्यासोबत असल्याचे अजित पवार यांनी सांगितलं.

मी नेहमी सत्याच्या बाजूने असतो 

अजित पवार म्हणाले की, मी नेहमी सत्याच्या बाजूने असतो. ते म्हणाले की, महिला आयोगाच्या रूपाली चाकणकरांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही. हे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता गेल्या काही दिवसांपासून वादाच्या केंद्रस्थानी आलेला रूपाली चाकणकर यांना कारवाईचा झटका बसणार का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. महिला आयोगावर सातत्याने विरोधकांकडून ताशेरे ओढले जात आहेत.

रूपाली चाकणकर मृत डॉक्टरची बदनामी करत आहेत

दुसरीकडे, सुषमा अंधारे म्हणाल्या की, पीडितेला न्याय मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचे सोडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर मृत डॉक्टरची बदनामी करत असल्याचा आरोप शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लक्ष घालून जबाबदार माणसाला आयोगावर नेमावे आणि आयोगाची इभ्रत राखावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

ती गेल्यानंतर तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय?

फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाच्या अनुषंगाने सुषमा अंधारे यांनी मुंबईत मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. चाकणकर यांनी फलटणमध्ये जाऊन घेतलेल्या पत्रकार परिषदेत मृत डॉक्टर युवतीचे चारित्र्यहनन केले. ती युवती कितीजणांशी मोबाइलवरून बोलत होती, याची माहिती माध्यमांसमोर दिली. जरी ती दोन मुलांबरोबर बोलत असेल तरी तिला मारण्याचा अधिकार कुणी दिला? ती गेल्यानंतर तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? असे सवाल अंधारे यांनी चाकणकरांना विचारले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महिला आयोग अध्यक्षांच्या नियुक्ती प्रकरणात लक्ष घालून जबाबदार व्यक्तीला पदावर नेमावे. पुनर्वसनासाठी पदाचा वापर होऊ देऊ नका. पक्षाची आणि महिला आयोगाची इभ्रत राखा, असेही अंधारे तटकरेंना उद्देशून म्हणाल्या.

नेमकं काय म्हणाल्या होत्या रुपाली चाकणकर?

दरम्यान, महिला आयोगाच्या रूपाली चाकणकर यांनी 27 ऑक्टोबर रोजी फलटण उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. आत्महत्या केलेली डॉक्टर युवती याच रुग्णालयात काम करत होती. या रुग्णालयामध्ये डॉक्टर युवतीला पोलिस विभागाकडून त्रास होत होता. याबाबतची चौकशी करण्यासाठी चाकणकर पोहोचल्या. त्यांनी रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर माध्यमांशी बोलताना ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगत म्हणाल्या की, "मी सर्व डॉक्टर, अधिकारी यांच्याशी चर्चा केली. डॉक्टर युवतीने आयसी कमिटीकडे तक्रार केली नव्हती. मात्र, पोलिस आणि डॉक्टर यांच्या एकमेकांबद्दल तक्रारी होत्या. आरोपींच्या बाबतीत फिट आणि अनफिट रिपोर्ट देण्यावरून तक्रारी होत्या. आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेने तीनवेळा बदलीच्या बाबतीत विचारणा होऊनही फलटणमध्येच थांबण्याचं ठरवलं होतं. त्यासाठी विशेष ऑर्डर करून बदली थांबवण्यात आली," असं रुपाली चाकणकर म्हणाल्या होत्या.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु
Subhash Jagtap On Prashnat Jagtap:प्रशांत जगतापांनी राजीनामा दिला अशी माहिती, सुभाष जगतापांची माहिती
Pune Mahaplalika NCP : अखेर पवारांचं ठरलं, पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
BMC Election: ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
Solapur Crime: रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
Embed widget