एक्स्प्लोर

Solapur News: 'गद्दारी करणाऱ्या प्रणिती शिंदेंसोबत आम्ही युती करणार नाही, त्या आमच्यासाठी चिल्लर' सोलापुरात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी!

आगामी स्थानिक निवडणुकांपूर्वी ठाकरे गटात वादाची ठिणगी! उपनेते शरद कोळी यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंवर हल्ला चढवत “त्या आमच्यासाठी चिल्लर आहेत” असं म्हटलं.

Solapur News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी सोलापुरात महाविकास आघाडीत वादाचे वारे वाहू लागले आहेत. शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्यात मतभेद उघडपणे समोर आले आहेत. ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर तीव्र टीका करत “त्या आमच्यासाठी चिल्लर आहेत” अशा खोचक शब्दात टीका केली आहे. 

“गद्दारी करणाऱ्या प्रणिती शिंदेसोबत आम्ही युती करणार नाही”

शरद कोळी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “विधानसभा निवडणुकीत गद्दारी करणाऱ्या प्रणिती शिंदेसोबत आम्ही युती करणार नाही. आघाडी तुटली तरी चालेल, पण त्यांचे नेतृत्व आम्हाला मान्य नाही.” त्यांनी पुढे आरोप केला की, “उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशाचा अवमान करणारी प्रणिती शिंदे महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यात अपयशी ठरल्या आहेत. विरोधकांशी हातमिळवणी करून आघाडीला मातीत आणि गाळात नेऊन ठेवले.”

“उद्धव साहेबासमोर झोळी पसरवून खासदार झाल्या”

शरद कोळी यांनी आपला संताप व्यक्त करत प्रणिती शिंदेंवर वैयक्तिक टीका केली. “उद्धव साहेबांसमोर मतासाठी झोळी पसरवून खासदार झालेल्या प्रणिती शिंदे आज मोठेपणा दाखवतात. पण शिवसेनेमुळे खासदार झाल्याचं भान त्यांना राहिलेलं नाही.” कोळी यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी स्वतः प्रणिती शिंदेंना सांगितलं होतं,  “शिवसेनेमुळे तुम्ही खासदार झाला आहात; आघाडीचा धर्म पाळा.” पण प्रणिती शिंदे यांनी तो आदेश पाळला नाही, त्यामुळे त्या “आमच्यासाठी चिल्लर आहेत”, असं कोळी म्हणाले.

“आघाडी चालेल, पण नेतृत्व मान्य नाही”

शरद कोळी यांनी स्पष्ट केलं की ठाकरे गटाला काँग्रेससोबत आघाडी करण्यात हरकत नाही, पण प्रणिती शिंदेंचं नेतृत्व कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही. त्यांच्या वक्तव्यामुळे सोलापूर काँग्रेस आणि ठाकरे गटातील तणाव वाढण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Satara Politics: शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
Solapur News: सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल
सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget