एक्स्प्लोर
पतीचा अंत्यविधी होताच पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या
पतीच्या निधनानंतर मिनाक्षी हिनेदेखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे,
बीड : पतीने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या अंत्यविधी आटोपल्यावर पत्नीने आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चकलंबा येथे घडली आहे. बुधवारी (11 मार्च) औरंगाबादमध्ये पतीने आत्महत्या केली होती. पत्नीने पतीच्या विरहाने आत्महत्या केली आहे. दरम्यान एक वर्षापूर्वीच लग्न झालेल्या या जोडप्यांनी आत्महत्या केल्याने मोठी शोककळा पसरली आहे.
गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील रणजित जाधव ( 22 वर्षे) आणि मिनाक्षी जाधव ( 20 वर्षे) यांचा एक वर्षापूर्वी विवाह झाला होता. रणजित जाधव हा औरंगाबाद येथे एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. विवाहानंतर रणजीत पत्नी मिनाक्षीसोबत औरंगाबाद येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. बुधवारी रणजित जाधव याने औरंगाबाद याठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली.
शवविच्छेदन करुन रणजित जाधव याचे पार्थिव रात्री उशिरा चकलांबा या गावी आणून अंत्यसंस्कार करण्यात आले. नातेवाईक दु:खात असतानाच गुरूवारी (12 मार्च) सकाळी ८ वाजता घरालगत असलेल्या शौचालयातील आडूला दोरी बांधून मिनाक्षी हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
एक वर्षापूर्वी रंजीत आणि मिनाक्षी यांचा विवाह झाला होता पण त्यामुळे पती-पत्नींच्या आत्महत्येनंतर गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान रंजीत जाधव याने का आत्महत्या केली होती याची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकली नाही. या जोडप्याने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र पतीच्या विराहामधूनच मीनाक्षीने आपली जीवनयात्रा संपवली का? याचा तपास पोलीस करत आहे.
Special Report | चिमुकल्याकडून शाळेत बळीराजावर कविता सादर... अन् त्याच रात्री पित्याची आत्महत्या
संबंधित बातम्या :
पत्नीचा अपघाती मृत्यू; 'मी तुला भेटायला येतोय,' असं स्टेटस ठेवून पतीची आत्महत्या!
सांगलीत तिहेरी हत्याकांडांने खळबळ; आई,वडील आणि बहिणीची भावाकडून हत्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement