एक्स्प्लोर

NCP Merger : होय, राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शरद पवार गटाच्या विलिनीकरणाबाबतचा प्रस्ताव आला होता; एबीपी माझाच्या बातमीला राष्ट्रवादीतील बड्या नेत्याचा दुजोरा

NCP Merger : पार्थ पवार यांच नाव निश्चित झाल्यामुळेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर विचार करता आला नसल्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बड्या नेत्यानी आता या संदर्भात माहिती दिली आहे.

NCP Merger मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यानं मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्यसभेचा अर्ज भरण्याच्या सात दिवस आधी सुद्धा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा (NCP Merger) शेवटचा प्रयत्न करण्यात आला होता. मविआकडून (MVA) शरद पवार (Sharad Pawar) यांना उमेदवारी दिली गेली तर विलिनीकरणाचे सगळे मार्ग बंद होणार, त्यामुळे अजूनही विचार करता येईल, अशा स्वरूपाचा तो प्रस्ताव होता. दरम्यान या संदर्भातील एबीपी माझाच्या बातमीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बड्या नेत्यानं दुजोरा दिला आहे. राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाबाबतचा प्रस्ताव आला होता. विलीनीकरण करताना शरद पवारांना संयुक्त राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार म्हणून घोषित करावे, अशी अट देखील घालण्यात आली होती.

NCP Merger : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यावर विचार केला नाही, कारण....

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यावर विचार केला नाही, कारण राज्यसभेचे उमेदवार म्हणून आधीच पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. पार्थ पवार यांच नाव निश्चित झाल्यामुळेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर विचार करता आला नसल्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बड्या नेत्यानी आता या संदर्भात माहिती दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर राज्यसभेचा अर्ज दाखल केला. भाजपनं चार, शिवसेनेनं एक, राष्ट्रवादीनं एक आणि मविआनं एक उमेदवार दिल्यानं राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एकीकडे राज्यसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न झाल्याची माहिती राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यानं दिली होती. शरद पवार यांना संयुक्त राष्ट्रवादीकडून राज्यसभेची 6 वर्षांची टर्म दिली जावी.तर पार्थ पवार यांना सुनेत्रा पवार यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर उमेदवारी दिली जावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना देण्यात आला होता. मात्र, राष्ट्रवादी पक्षाकडून यावर कोणतेच उत्तर न आल्याने अखेर शरदचंद्र पवार पक्षाने मविआकडून उमेदवारी घेत अर्ज भरला आणि आता ही निवडणूक बिनविरोध होत आहे.


 इतर महत्वाच्या बातम्या

Sharad Pawar and Parth Pawar: आजोबांपेक्षा नातू श्रीमंत! पार्थ पवारांची संपत्ती शरद पवारांपेक्षा जास्त, राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातील माहिती

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
मंत्री फोन उचलत नाहीत, उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवा, श्रीकांत शिंदेंसमोरच संतोष बांगर आक्रमक
मंत्री फोन उचलत नाहीत, उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवा, श्रीकांत शिंदेंसमोरच संतोष बांगर आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
धाराशिवमधील एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांची टीप; शिवसेना वादावर श्रीकांत शिंदे स्पष्टच बोलले
धाराशिवमधील एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांची टीप; शिवसेना वादावर श्रीकांत शिंदे स्पष्टच बोलले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार
Ashok Kharat : अशोक खरातच्या दारावर ईडी, तपासाची 'साप' शिडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CMRF : मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी, रुग्णालयांमार्फत अर्जाची सुविधा
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी मिळणार
Paratwada Crime : तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
Bihar : बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, नवी दिल्ली ते पाटणा राजकीय घडामोडी वाढल्या
बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, राजकीय घडामोडी वाढल्या
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
Home Loan : आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
ED Raid On Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
Embed widget