एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 10 सप्टेंबर 2019 | मंगळवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 10 सप्टेंबर 2019 | मंगळवार*
- आरेला हात लावला तर आम्ही सहन करणार नाही, आदित्य ठाकरे यांनी ठणकावलं, जागा सुचवण्यात घोटाळा झाल्याचाही संशय, अश्विनी भिडे यांच्या बदलीचीही मागणी https://bit.ly/2kBN9Z6
- विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपत 20 ते 25 जागांची अदलाबदल, मतांच्या टक्केवारीचा निकष, काही विद्यमान आमदारांवरही टांगती तलवार https://bit.ly/2lMkoZU
- वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम युती अखेर तुटली, इम्तियाज जलील यांची भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका, असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून स्पष्ट https://bit.ly/2lNRVTu
- काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार, दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत प्रवेश https://bit.ly/2kBVXOL
- मित्र पक्षांनी भाजपच्याच चिन्हावर लढण्याची मुख्यमंत्र्यांची ऑफर, रासपचे महादेव जानकर आणि रिपाइंच्या रामदास आठवलेंचा नकार, राष्ट्रीय नोंदणी धोक्यात येण्याची भीती https://bit.ly/2kEuITA
- प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा, पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून सोडचिठ्ठी, विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का https://bit.ly/2lGr3oI
- सांगली, कोल्हापूरनंतर कडकनाथ कोंबडी घोटाळ्याचं लोण नाशिकमध्ये, 19 शेतकऱ्यांची पोलिसात तक्रार, महारयत अॅग्रोच्या चार कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा https://bit.ly/2lNJTtP
- जम्मू-काश्मीर भारताचं राज्य, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचं वक्तव्य, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत जम्मू-काश्मीरविरुद्ध गरळ ओकल्यानंतर बाहेर मात्र कबुली https://bit.ly/2k9sI5D
- आयफोन-11, अॅपल वॉच आणि अॅपल टीव्हीचं आज लॉन्चिंग, भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री साडे 11 वाजता लॉन्चिंग सोहळा https://bit.ly/2lNRiJC
- क्रिकेटपटू मोहम्मद शमीला मोठा दिलासा, कौटुंबिक हिंसाचाराप्रकरणी जारी केलेल्या अटक वॉरंटला पश्चिम बंगालमधील जिल्हा न्यायालयाकडून स्थगिती https://bit.ly/2kD9JAK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
महाराष्ट्र
Advertisement