एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 26 ऑगस्ट 2019 | सोमवार | एबीपी माझा
#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. जी-7 परिषदेत भाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅरिसमध्ये दाखल, 370 कलम हटवल्यानंतर पहिल्यांदाच होणार मोदी आणि ट्रम्प यांची भेट
2. महिनाभरात एक कोटी लोकांचा रोजगार जाण्याची शक्यता, आर्थिक मंदीवर टीका करताना संजय राऊतांकडून भीती व्यक्त, मेक इन इंडिया, स्किल इंडियावरही ताशेरे
3. भाजपात जागावाटपाचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त मुख्यमंत्री आणि अमित शाहांनाच, उद्धव ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांना टोला
4. निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेत इनकमिंग सुरुच, बोईसरचे बविआचे आमदार विलास तरेंच्या हाती शिवबंधन, राष्ट्रवादीचे भास्कर जाधवांही उद्धव ठाकरेंच्या भेटीला
5. छगन भुजबळांना शिवसेनेचे दरवाजे बंदच, नाशकातल्या शिवसैनिकांच्या नाराजीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा शब्द, सूत्रांची माहिती
6. परळी, केजमध्ये राष्ट्रवादीचा आमदार आल्याशिवाय बीडमध्ये फेटा बांधणार नाही, खासदार अमोल कोल्हेंची शपथ, तर ईडीच्या कारवाईवरुन सुप्रिया सुळेंचं सरकारला आव्हान
7. जयदत्त क्षीरसागर यांनी 50 कोटी रुपये देऊन मंत्रिपद मिळवलं, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीप क्षीरसागर यांचा आरोप, काका-पुतण्याचा वाद शिगेला
8. अभिनेता संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार, वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील महामेळाव्यात महादेव जानकर यांची माहिती, 25 सप्टेंबरला पक्षप्रवेश होण्याची शक्यता
9. अँटिगा कसोटीत टीम इंडियाकडून वेस्ट इंडिजचा 318 धावांनी धुव्वा, दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताची 1-0 अशी आघाडी
10. पी व्ही सिंधू बनली जागतिक बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय, जपानच्या नोझोमी ओकुहाराला हरवून इतिहास रचला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement