स्मार्ट बुलेटिन | 26 मार्च 2020 | गुरुवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढून 122 वर, मुंबईत दहा तर सांगलीत पाच नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, जगभरात 21 हजार 200 बळी
2. देशभरातील सर्व टोलनाक्यांवर तात्पुरती टोलमाफी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा, कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्णय
3. लॉकडाऊन काळात गहू 2 रुपये किलो तर तांदूळ 3 रुपये किलो दराने मिळणार, गरिबांचे हाल न होण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय
4. राज्यात शेतकऱ्यांवर अस्मानी संकट, राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने मोठे नुकसान, आज आणि उद्याही पावसाचा अंदाज
5. संचारबंदीत घराबाहेर थांबण्यास विरोध केल्याने टोळक्याकडून पोलिसांना विटांनी मारहाण, बीडमधील धक्कादायक घटना
6. मुंबईतील दादर, भायखळा भाजीपाला मार्केट सुरु; नवी मुंबई एपीएमसीही सुरु होणार, अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
7. तुमच्या या त्यागाला महाराष्ट्र कधीच विसरणार नाही, महलूमंत्री बाळासाहेब थोरात यांचं राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आभार मानण्यासाठी पत्र
8. हातावर पोट असणाऱ्या स्थलांतरित कामगारांनी लॉकडाऊनमुळे गावची वाट धरली, उन्हाची काहिली झेलत लेकरांसह गुजरात ते पालघर तब्बल 35 ते 40 किमी पायी प्रवास
9. ब्रिटनच्या राजघराण्यालाही कोरोनाचा फटका, कोरोना पॉझिटिव्ह असलेले प्रिन्स चार्ल्स आयसोलेशनमध्ये, तर पत्नी कॅमिला यांची चाचणी निगेटिव्ह
10. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचं वय 58 वरुन 60 करणारा अध्यादेश हायकोर्टाकडून रद्द, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या कार्यरत अधिकाऱ्यांना न हलवण्याची सूचना