एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 21 ऑक्टोबर 2020 | बुधवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबाद दौऱ्यावर; दुपारी 1.30 वाजता पत्रकार परिषद, मोठी घोषणा करण्याची शक्यता
- कामावर जाण्यासाठी सकाळी सातपासूनच लोकल प्रवासाची महिलांची मागणी; तर सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्याचा विचार, आज राज्य आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये बैठक
- राज्यात मास्क दरावर अखेर नियंत्रण, मास्कचे नवे दर 3 रुपये ते 127 रुपये; किंमती नियंत्रणात आणण्याचा अहवाल देणारे अधिकारी सुधाकर शिंदेंची बदली
- मुंबई वीज पुरवठा ठप्प होण्यावरून राज्य सरकारने नेमली चौकशी समिती, दोषींवर कठोर कारवाईचे ऊर्जामंत्र्याचे संकेत
- कोकणातली रिफायनरी प्रकल्प बारगळला, रायगडमध्ये पाच हजार एकरवर रिफायनरी ऐवजी ओषध निर्मिती प्रकल्प उभारणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
- पुण्यात दुसऱ्या दिवशीही ऑनलाईन परीक्षेत तांत्रिक बिघाड; तर घोळामुळे अमरावती विद्यापीठाची आजची परीक्षा रद्द, उद्यापासून मात्र नियमीत परीक्षा
- नंदुरबारमध्ये धुळे-सूरत महामार्गावर भीषण अपघात, कोडांईबारी घाटातल्या दरीत बस कोसळून पाच जणांचा जागीच मृत्यू, तर 35 जण गंभीर जखमी
- बीएमसी नगरसेवकांची कामगिरी 2019-20 मध्ये 55.7 टक्क्यांपर्यंत घसरली, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल
- देशात लॉकडाऊन संपलं आहे, मात्र सर्वांनी काळजी घेणे आवश्यक, पंतप्रधान नरेंद्र मोदीचं देशवासियांना आवाहन
- धवनच्या शतकानंतरही दिल्लीच्या पदरी पराभव; किंग्स इलेव्हन पंजाब 5 विकेट्सनी विजयी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement