एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 01 नोव्हेंबर 2019 | गुरुवार | एबीपी माझा
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. युतीत महाभारत सुरु असताना सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी शिवसेनेशी हातमिळवणी करण्याची शक्यता, सुत्रांची माहिती, दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये खलबतं झाल्याची चर्चा
2. राष्ट्रवादीनंतर काँग्रेसमध्येही शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात राजकीय हालचालींना वेग, राज्यातीन नेत्यांचं शिष्टमंडळ दिल्लीत सोनिया गांधींशी चर्चा करणार
3. कुणीही मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा घालून आल्याचं समजू नये, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा, फडणवीसांच्या विधानामुळेच चर्चा फिस्कटल्याचा ठपका
4. 7 नोव्हेंबरपर्यंत पावसाचा महाराष्ट्रात मुक्काम, अवकाळीचा तडाखा सोसणाऱ्या बळीराजाच्या चिंतेत भर, तातडीच्या मदतीसाठी शिवसेना आमदार राज्यपालांच्या भेटीला
5. ओला दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक पाठवणार, गृहमंत्री अमित शाह यांचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आश्वासन
6. शरद पवार 6 नोव्हेंबरला परभणी, हिंगोलीच्या दौऱ्यावर, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार
7. महिन्याभरात पीएमसी बँकेच्या करंट अकाऊंटचे व्यवहार सुरु होतील, तपास अधिकाऱ्यांची माहिती, पीएमसीची संपत्ती जप्त करून लिलाव करण्याचे आदेश
8. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून भारतीय पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी, इस्रायलच्या एनएसओ कंपनीविरोधात व्हॉट्सअॅपचा खटला, केंद्र सरकारने खुलासा मागितला
9. खड्डे बुजवण्यात अपयशी ठरलेल्या मुंबई महापालिकेचं हास्यास्पद चॅलेंज, 1 फुटाचा खड्डा दाखवल्यास 500 रुपये देणार, मुंबईकरांनी उडवली खिल्ली
10. वडाळा पोलीस कोठडीत तरुणाच्या मृत्यूप्रकरणी याचिका, तातडीने सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement