एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 16 मार्च 2019 | शनिवार | एबीपी माझा
VIDEO | स्मार्ट बुलेटिन | 16 मार्च 2019 | शनिवार | एबीपी माझा
- भाजप आज लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर कऱणार, दिल्लीत संसदीय समितीची बैठक, काँग्रेसची दुसरी तर राष्ट्रवादीची तिसरी यादी येण्याची शक्यता
- पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगा शरद पवारांना भाजपत घेऊ नका, त्यांना तिथेच राहू द्या, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची नितीन गडकरींकडे मागणी
- सुजय विखेंना राष्ट्रवादीची ऑफर होती, गटबाजीच्या भीतीतून त्यांनी उमेदवारी नाकारली, इंदापूरमध्ये अजित पवारांचा गौप्यस्फोट
- हिंमत असेल तर निवडणूक लढवा, विश्वजीत कदमांचे प्रतीक पाटलांना आव्हान, लोकसभेच्या उमेदवारीवरुन सांगली युवा काँग्रेसमध्ये वाद,
- सांगलीची जागा स्वाभिमानी पक्षाला दिल्यास पक्ष कार्यालयाला टाळे ठोकू, काँग्रेस कार्यकर्त्यांचा पक्षश्रेष्ठींना इशारा
- निवडणुकांच्या तोंडावर पोलिस कारवायांना वेग, नागपूरच्या सावनेरमधून 80 लाखांची रोकड जप्त, तर नेत्रावती एक्स्प्रेसमधून 532 बाटल्या दारु हस्तगत
- सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई महापालिकेची पहिली कारवाई, दोन अधिकारी निलंबित, अन्य दोघांची चौकशी, तर आयुक्त अजॉय मेहतांचा पत्ता नाही
- डोंबिवलीच्या पादचारी पुलाची धोकादायक अवस्था, पूल अक्षरशः हलत असल्यानं नागरिकांमध्ये दहशत, तर ठाण्याच्या कोपरी पुलाच्या दुरुस्तीसाठी मनसे आक्रमक
- पादचाऱ्याला उडवून जाणाऱ्या गाडीला सातारा पोलिसांनी सोडलं, गाडी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची असल्याचं कळताच कारवाई नाही, दुर्घटनेत पादचाऱ्याचा मृत्यू
- मी तुझा बाप आहे, बुक्कीत दात पाडीन, पंढरपूरात पोलीस अधिकाऱ्याच्या अतिक्रमणविरोधी कारवाईवर आमदार भारत भालकेंचा रुद्रावतार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement