Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 6 ऑक्टोबर 2021 बुधवार | ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
![Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 6 ऑक्टोबर 2021 बुधवार | ABP Majha ABP Majha smart bulletin 6 October 2021 Wednesday Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 6 ऑक्टोबर 2021 बुधवार | ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/06/ed3ec6b1d7c9eb57ed0f2f7e4cf8ad83_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 6 ऑक्टोबर 2021 बुधवार | ABP Majha
1.ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडलेल्या राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज
2. राहुल गांधींना लखीमपूरला जाण्यास परवानगी नाकारली, तर अटकेची कारवाई करणाऱ्या यूपी सरकारवर प्रियांका गांधींचा हल्लाबोल, जामिनाचा अर्ज भरण्यास नकार
3. संजय राऊतांनी घेतली राहुल गांधींची भेट, नुकतंच काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या कन्हैया कुमारशीही राऊतांची खलबतं
4. कोविडमध्ये दोन्ही पालक गमावलेल्या 306 अनाथ बालकांच्या खात्यात सुमारे साडे पंधरा कोटी रुपये जमा, मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती
5. सातारा, सोलापूर, जालन्याला पावसानं झोडपलं, परभणीत वीज कोसळून दोघांचा मृत्यू, उजनी ओव्हरफ्लो, तर जायकवाडीचे आपत्कालीन दरवाजेही उघडले
6. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात इव्हेंट कंपनीच्या चौघांना अटक, आरोपींची संख्या 16 वर, एनसीबीचं ऑपरेशन सुरुच
7. पुण्यातील लोहगाव विमानतळावरून 16 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबरच्या काळात विमान उड्डाणं बंद, देखभालीच्या कामासाठी विमानतळ बंद राहणार
8. उद्यापासून पंढरपूरच्या विठुरायाच्या मुखदर्शनाचा मार्ग मोकळा, रोज 10 हजार भाविकांना मिळणार दर्शन, देवस्थान समितीचा निर्णय
9. रामायण मालिकेत रावणाची भूमिका साकारणाऱ्या अरविंद त्रिवेदी काळाच्या पडद्याआड, वयाच्या 82 व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आल्यानं निधन
10. आयपीएलच्या 51 व्या सामन्यात मुंबईची राजस्थानवर 8 गडी राखून मात, प्लेऑफच्या आशा अजून जिवंत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)