(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 20 ऑगस्ट 2021 शुक्रवार | ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 20 ऑगस्ट 2021 शुक्रवार | ABP Majha
1. प्रशासनाचा विरोध झुगारत सांगलीत बैलगाड्यांच्या शर्यती पार, सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा बैलगाडीसह मंत्रालयावर मोर्चा, आ. पडळकरांचा इशारा
2. मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी सोनिया गांधींची आज बैठक, शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी उपस्थित राहणार
3. राज्यातील शाळा, महाविद्यालयं सुरु करण्याचा निर्णय तीन दिवसांत, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती, संबंधित विभागाच्या अहवालावर टास्क फोर्स निर्णय घेणार
4. पुढील दोन दिवस राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज, विदर्भातील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5. नारायण राणेंनी दर्शन घेतल्याने बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शिवसैनिकांकडून शुद्धीकरण, भाजपची शिवसेनेवर सडकून टीका
6. भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत खिसेकापू चोरांचा कहर, कार्यकर्त्यांचे खिसे कापणाऱ्या टोळीला ठाण्यात अटक
7. कोरोनामुळं घरातल्या कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यानं राज्यातल्या 20 हजार महिलांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर, 124 तालुक्यांतील सर्वेक्षणातून समोर
8. दहशतवाद जगासाठी चिंता, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताची भूमिका, दहशतवादाला रसद पुरवणाऱ्या देशांचा बंदोबस्त करण्याची मागणी
9. गुप्तांगातून एका किलो सोन्याच्या तस्करीचा प्रयत्न, केनियातील तीन महिलांना मुंबई विमानतळावर अटक, एनसीबीची कारवाई
10. नागपुरातून अफगाणिस्तानात परत पाठवण्यात आलेला नूर मोहम्मद तालिबामध्ये सहभागी झाल्याचा संशय, व्हायरल झालेल्या फोटोवरुन नवे प्रश्न निर्माण