एक्स्प्लोर

3rd August Headline : विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्ताव, ज्ञानवापी प्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल; आज दिवसभरात...

3rd August Headline : विधानसभेत विरोधकांकडून अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. ज्ञानवापी प्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाकडून आज निकाल येणे अपेक्षित आहे.

3rd August Headline :  आज विधानसभेत विरोधकांकडून अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. विरोधी पक्ष नेत्याच्या नावाची घोषणा बुधवारीदेखील झाली नाही. त्यामुळे काँग्रेसचे विजय वड्डेवाटीवार विरोधी पक्ष नेते म्हणून अंतिम आठवडा सादर करण्याची संधी मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे. संसदेच्या मान्सून अधिवेशनात आजही मणिपूर प्रश्नावरुन गदारोळ होण्याची शक्यता आहे.  

 

संसदेचे मान्सून अधिवेशन 

- मणिपूर प्रश्नावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ सुरूच राहू शकतो.

- भाजपने आज लोकसभेच्या खासदारांसाठी व्हीप जारी केला आहे.

- संसद भवनात आज सकाळी विरोधी पक्षांची बैठक होणार आहे.  संसदेच्या कामकाजातील रणनीती ठरवण्यासाठी बैठक होणार आहे.


ज्ञानवापी प्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय

प्रयागराज - ज्ञानवापी प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आज निकाल येण्याची शक्यता आहे. वादग्रस्त जागेचे सर्वेक्षण करण्याच्या आदेशाविरोधातील मशीद समितीच्या याचिकेवर न्यायालयाचा निर्णय येणार आहे.


विधिमंडळ अधिवेशन
 

- आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रास्ताव मांडला जाणार असून विरोधकाकडून संभाजी भिडे यांचा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता आहे. भिडे ना अटक करण्याची मागणी विरोधक करत आहेत. तर, विरोधी पक्ष नेत्यांची निवड विधानसभा अध्यक्षांकडून जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विधानसभा अध्यक्ष हे विजय वड्डेवाटीवार यांना विरोधी पक्ष नेते म्हणून बोलण्याची संधी देणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून मविआ आमदारांच्या बैठकीचे आयोजन
  

मुंबई -  महाविकास आघाडीच्या आमदारांची आज बैठक होणार आहे. काँग्रेसने आजच्या बैठकीचे आयोजन केलं आहे. नाना पटोले यांच्यावतीने बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. 
 

नव्या आमदार निवासाचे बांधकाम शुभारंभ

आज मनोरा आमदार निवास बांधकामाचा शुभारंभ होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थित सकाळी हा कार्यक्रम पार पडणार आहे. 40 मजली आणि 28 मजली अशा दोन इमारती बांधण्यात येणार आहे. 1 हजार चौरस फुटाचा फ्लॅट असणार आहे. 

संभाजी भिडे सांगलीमध्ये दाखल

सांगली - आपल्या अनेक वक्तव्यांनी चर्चेत आलेल्या आणि वादग्रस्त बनलेले संभाजी भिडे सांगलीमध्ये दाखल झाले आहेत. बुधवारी सोलापूरमध्ये धारकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे.
 
 संभाजी भिडे चिपळूण दौऱ्यावर 

रत्नागिरी - आज संभाजी भिडे चिपळूण दौऱ्यावर आहेत. त्यांच्या कार्यक्रमाला आजून परवानगी मिळालेली नाही.


अहमदनगरमध्ये आंदोलनाचा दिवस 

- महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या निषेधार्थ सकाळी 11 वाजता फुले ब्रिगेडच्या वतीने आंदोलन केलं जाणार आहे. यावेळी महात्मा फुले यांच्या पुतळ्याला दुग्धभिषेक घातला जाणार आहे.

- हरयाणातील मेवातच्या नुह येथे बजरंग दलाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारी धार्मिक ब्रजमंडल यात्रा या धार्मिक यात्रेवर दगडफेक, हिंसाचार, जाळपोळ आणि थेट गोळ्या झाडल्याच्या निषेधार्थ दुपारी बजरंग दल नगर शहराच्यावतीने दिल्ली गेट येथे आंदोलन करण्यात येणार आहे.
 

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
Praful Patel Meet Sharad Pawar: ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीची भेट, त्यादिवशी शरद पवारांशी काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीची भेट, त्यादिवशी शरद पवारांशी काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
ऊसाला 3600 भाव द्या, अन्यथा 1 लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा, शेट्टींचा सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना  इशारा 
ऊसाला 3600 भाव द्या, अन्यथा 1 लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा, शेट्टींचा सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना  इशारा 
जास्त काळ भाजपसोबत राहू नका, रोहित पवारांची एकनाथ शिंदेंना विनंती, म्हणाले सरकारचं  डोकं सटकलंय
जास्त काळ भाजपसोबत राहू नका, रोहित पवारांची एकनाथ शिंदेंना विनंती, म्हणाले सरकारचं  डोकं सटकलंय

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2026 | रविवार
हौथींचा सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला, रियाधमधील तेल कंपनी अरामकोच्या इमारतीचे नुकसान, हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तराचा इशारा
हौथींचा सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला, रियाधमधील तेल कंपनी अरामकोच्या इमारतीचे नुकसान, हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तराचा इशारा
गेल्या 8 वर्षात प्रथमच मुहूर्त ट्रेडिंगवर घसरण! सेन्सेक्स 29 अंकांनी, निफ्टी 44 अंकांनी घसरून बंद; बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री
गेल्या 8 वर्षात प्रथमच मुहूर्त ट्रेडिंगवर घसरण! सेन्सेक्स 29 अंकांनी, निफ्टी 44 अंकांनी घसरून बंद; बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
पश्चिम बंगाल SIR न्यायाधिकरणात सलग चौथ्या न्यायाधीशांचा राजीनामा; मुर्शिदाबादमधील लाखो मतदारांची अपीले रखडली; इथंच 91 लाख मतदारांची नावे वगळली!
पश्चिम बंगाल SIR न्यायाधिकरणात सलग चौथ्या न्यायाधीशांचा राजीनामा; मुर्शिदाबादमधील लाखो मतदारांची अपीले रखडली; इथंच 91 लाख मतदारांची नावे वगळली!
Satara Bank News: अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
Finolex Cables : मुहूर्त ट्रेडिंगचं सत्र गाजवलं, फिनोलेक्स केबल्सच्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, स्टॉकमध्ये तब्बल 20 टक्के तेजी, जाणून घ्या कारण
मुहूर्त ट्रेडिंगचं सत्र गाजवलं, फिनोलेक्स केबल्सच्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, स्टॉकमध्ये तब्बल 20 टक्के तेजी
'ED 'सुपर कॉप' नाही, कायद्याच्या चौकटीत राहूनच काम केलं पाहिजे..' हायकोर्टानं मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई रद्द करत थेट फटकारलं
'ED 'सुपर कॉप' नाही, कायद्याच्या चौकटीत राहूनच काम केलं पाहिजे..' हायकोर्टानं मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई रद्द करत थेट फटकारलं
Embed widget