एक्स्प्लोर
26/11 चा हिरो 'मॅक्स'चा देशवासियांना अलविदा !
मुंबई : मुंबई दहशतवादी हल्ल्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या 'मॅक्स' या श्वानाचा मृत्यू झाला. त्याच्यावर आज अंतिम संस्कार करण्यात आले.
'मॅक्स'ने मुंबईवरील 26/11 हल्ल्यावेळी मोलाची भूमिका बजावली होती. 'मॅक्स'ने 8 किलो आरडीएक्स आणि 25 ग्रेनाईड पकडून दिल्यानं शेकडोंचे प्राण वाचले होते. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याला 'गोल्ड मेडल'ने गौरवण्यात आलं होतं.
याशिवाय 'झवेरी बाजार' मधील स्फोटात 'मॅक्स'ने स्फोटकं शोधली होती.
28 ऑक्टोबर 2004 रोजी जन्माला आलेला मॅक्स 2 महिन्याचा असताना मुंबई बॉम्बस्फोटक पथकात दाखल झाला होता. पुण्याच्या प्रशिक्षण केंद्रात त्याला प्रशिक्षण दिलं होतं.
10 वर्ष देशाची सेवा केल्यानंतर मॅक्स थकला होता. मार्च 2015 मध्ये मुंबई बॉम्बस्फोटक पथकातून निवृत्ती घेवून मॅक्स फिजा शहा यांच्या विरार येथील 'फिजा फॉर्म'मध्ये आपलं जीवन जगत होता.
त्याला काही महिन्यांपासून श्वसनाचा त्रास होता. 'फिजा फार्म'मध्ये त्याच्यावर उपचारही सुरू होते. त्याच्यासोबत या फार्ममध्ये गोल्डी, टायगर, सुलतान आणि सिजर हे श्वानही होते. गेल्या वर्षी गोल्डीचं निधन झालं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement