एक्स्प्लोर
Advertisement
'बाबा मी चाललो', व्हिडीओ रेकॉर्ड करुन औरंगाबादमध्ये तरुणाची आत्महत्या
आत्महत्येपूर्वी स्वतःचा व्हिडीओ रेकॉर्ड करून 22 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली. सलीम अली सरोवरात उडी मारत त्याने आत्महत्या केली.
औरंगाबाद : ‘बाबा मी चाललो, आता तुम्हाला भेटणार नाही. मला शोधायचे असेल तर सलीम अली सरोवरात शोधा,’ असा व्हिडीओ रेकॉर्ड करून 22 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली. सलीम अली सरोवरात उडी मारत त्याने आत्महत्या केली.
आदेश कचरू खरात असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. आपण आत्महत्या करणार असल्याचा त्याने व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये करून मोबाइल दुचाकीच्या डिक्कीत ठेवला. त्यानंतर सलीम अली सरोवराजवळ दुचाकी ऊभी करून त्याने पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली.
5 मार्चला दुपारपासून आदेश बेपत्ता झाल्याने नातलगांनी त्याचा शोध सुरु केला होता. मात्र तो सापडत नव्हता. त्यामुळे त्याच्या नातलगांनी बेपत्ता झाल्याबाबत उस्मानपुरा ठाण्यात तक्रार दिली.
दरम्यान, आदेशची दुचाकी सलीम अली सरोवराजवळ 6 मार्चला सकाळी सापडली. यानंतर सिटी चौक पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दुचाकीसह डिक्की तपासली असता आत मोबाईल सापडला. त्यांनी मोबाईलची तपासणी केली, त्यावेळी आत्महत्येपूर्वीचा व्हिडीओ पोलिसांना दिसला. त्यावरून त्याने सलीम अली सरोवरात आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं.
बातमीचा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
मुंबई
राजकारण
बॉलीवूड
Advertisement