एक्स्प्लोर

कोल्हापूर महापालिकेतील 20 नगरसेवकांचं पद रद्द

कोल्हापूर महापालिकेतील नगरसेवकांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेतील नगरसेवकांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. विहित मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना आणि भाजपच्या एकूण 20 नगरसेवकांचं पद रद्द केलं आहे. या प्रकारामुळे कोल्हापूर महापालिकेत खळबळ माजली आहे. आरक्षित जागेवर निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना निवडणुकीनंतर सहा महिन्यात जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक असतं. मात्र या नगरसेवकांनी निर्धारित वेळेत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचं पद रद्द करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे या प्रभागात फेरनिवडणूक होणार आहे. ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे ते निवडणूक पुन्हा लढवू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 आणि काँग्रेसच्या 7 नगरसेवकांचं पद रद्द करण्यात आलं आहे. तसंच भाजप-ताराराणी आघाडी आणि शिवसेनेच्या एकूण 9 नगरसेवकांचं पद रद्द करण्यात आलं आहे.  यामध्ये अश्विनी रामाणे, स्वाती येवलुजे आणि हसीना फरास या तीन माजी महापौरांचा समावेश आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा प्रभाव फक्त कोल्हापूर महापालिकेवरच नाही तर राज्यातील 27 महापालिकांसह, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर होणार आहे. कोल्हापूर महापालिकेतील पक्षीय बलाबल भाजपा - 13 ताराराणी - 19 काँग्रेस - 27 राष्ट्रवादी काँग्रेस - 15 शिवसेना - 04 अन्य - 02 या नगरसेवकांचं पद रद्द काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी 1. सुभाष बुचडे (काँग्रेस) 2. स्वाती येवलुजे(काँग्रेस) 3. रिना कांबळे(काँग्रेस) 4. शमा मुल्ला (राष्ट्रवादी काँग्रेस) 5. हसीना फरास (राष्ट्रवादी काँग्रेस) 6. अफजल पिरजादे (राष्ट्रवादी काँग्रेस) 7. संदिप नेजदार(काँग्रेस) 8. वृषाली कदम(काँग्रेस) 9. अश्विनी रामाणे(काँग्रेस) 10. दिपा मगदूम(काँग्रेस) 11. सचिन पाटील(राष्ट्रवादी काँग्रेस) भाजप-ताराराणी आघाडी 12. कमलाकर भोपळे 13. किरण शिराळे 14. अश्विनी बारामते 15. सविता घोरपडे 16. विजयसिंह खाडे-पाटील 17. मनीषा कुंभार 18. निलेश देसाई 19. संतोष गायकवाड शिवसेना 20. नियाज खान संबंधित बातम्या  विहित मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र न देणाऱ्या नगरसेवकांचं पद धोक्यात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 01 October 2024 : आज 'या' राशींवर राहणार महादेवाची कृपा; अडकलेली कामं होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींवर राहणार महादेवाची कृपा; अडकलेली कामं होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maratha Aandolak On Laxman Hake : पुण्यात मराठा आंदोलकांनी हाकेंना घेरलं, मद्यप्राशन केल्याचा आरोपABP Majha Headlines : 11 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सBaramati Student Murder : बारामतीमध्ये दिवसाढवळ्या महाविद्यालयात विद्यार्थ्याची कोयत्याने हत्याZero Hour Israel vs lebanon : लेबनॉनवर इस्त्रायलचे हल्ले; हिजबुल्लाचा म्होरक्या हसन नसरल्लाचा खात्मा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 01 October 2024 : आज 'या' राशींवर राहणार महादेवाची कृपा; अडकलेली कामं होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींवर राहणार महादेवाची कृपा; अडकलेली कामं होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्याचे; नशीब सोन्यासारखं उजळणार, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्याचे; नशीब सोन्यासारखं उजळणार, होणार अपार धनलाभ
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
October Monthly Horoscope 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
Embed widget