SSC Results दहावीच्या निकालाचा लातूर पॅटर्न; विभागात 113 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण, मुलींनी मारली बाजी
SSC Results महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या छत्रपती लातूर विभागीय मंडळाचा 2025 चा निकाल 92.77 टक्के लागला आहे.

लातूर : राज्यात 12 वीनंतर आता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल (SSC Results) आज जाहीर झाला. राज्यात यंदा दहावीचा निकाल 94.10 % लागला असून कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 98.82 टक्के असून नागपूर विभागात सर्वात कमी 90.78 टक्के निकाल लागला आहे. लातूर (Latur) पॅटर्नचा यंदाही म्हणावा तेवढा निकाल दिसला नाही. कारण, राज्यातील 9 विभागांपैकी लातूर विभागाचा निकाल यंदा शेवटून दुसऱ्या क्रमांवर असून 92.77 टक्के एवढा आहे. मात्र, लातूरमधील 113 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवल्याने पुन्हा एकदा लातूर पॅटर्नची चर्चा होताना दिसून येईल. राज्यात एकूण 211 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले असून लातूरमधील 113 विद्यार्थ्यांनी (Student) 100 टक्के गुण मिळवत देदीप्यमान कामगिरी बजावल्याचं दिसून येतं. दरम्यान, लातूर विभागात धाराशिव जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आह.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या छत्रपती लातूर विभागीय मंडळाचा 2025 चा निकाल 92.77 टक्के लागला आहे. येथील विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण घेण्याची परंपरा यावर्षीही कायम ठेवली. जवळपास 113 विद्यार्थ्यांनी शंभर पैकी 100 गुण घेतले आहेत. राज्यात शंभर टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 211 असण्याची माहिती आहे. त्यापैकी 113 विद्यार्थी लातूर विभागाचे आहेत, अशी माहिती लातूर बोर्डचे विभागीय अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी दिली.
लातूरमधील 97 हजार 990 विद्यार्थी उत्तीर्ण
लातूर विभागाचा निकाल 92.77 टक्के निकाल लागला असून, या परीक्षेसाठी 97 हजार 990 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 35 टक्क्यांवर 7 हजार 677 उत्तीर्ण झाले. 45 टक्यांवर गुण घेणारे विद्यार्थी 24 हजार 280 आहेत. तर, प्रथम श्रेणीत 32 हजार 335 तर प्राविण्यासह 33 हजार 698 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेसाठी लातूर विभागातून 1 लाख 5 हजार 619 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यात 1 लाख 7 हजार 8 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यातील 97 हजार 990 उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये, शंभर टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 113 आहे.
लातूर विभागीय मंडळात मुलींचीच बाजी
लातूर विभागीय मंडळात 97.37% निकालासह धाराशिव जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. 92. 36 टक्क्यांसह लातूर दुसऱ्या क्रमांकावर, तर 91.93 टक्क्यांसह नांदेड तिसरा क्रमांकावर आहे. बारावी पाठोपाठ दहावीच्या निकालातही लातूर विभागीय मंडळात धाराशिव जिल्ह्याचा दबदबा पाहायला मिळाला. लातूर विभागातून 95.37% निकालासह धाराशिव जिल्हा अव्वल ठरला. यापूर्वी एचएससी बोर्डाच्या निकालातही धाराशिव जिल्ह्याने पहिला क्रमांक मिळवला होता. तर दुसरीकडे विभागाच्या एकूण निकालात मुलींचे वर्चस्व पाहायला मिळालं 95.49% निकालासह दहावी परीक्षा निकालात मुलींनी बाजी मारली. लातूर विभागात 446 शाळांचा शंभर टक्के निकाल लागला. तर दहा शाळांचा शून्य टक्के निकाल लागला. शून्य टक्के निकाल लागलेल्या शाळांमध्ये लातूर आणि नांदेडमधल्या प्रत्येकी चार तर धाराशिव जिल्ह्यातील दोन शाळांचा समावेश आहे. लातूर विभागीय मंडळाचा दहावीचा एकूण निकाल 92.77% एवढा लागला आहे.
निकालाची विभागनिहाय टक्केवारी
पुणे : 94.81 टक्के
नागपूर : 90.78 टक्के
संभाजीनगर : 92.82 टक्के
मुंबई : 95.84 टक्के
कोल्हापूर : 96.78 टक्के
अमरावती : 92.95 टक्के
नाशिक : 93.04 टक्के
लातूर : 92.77 टक्के
कोकण : 98.82 टक्के
हेही वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
























