एक्स्प्लोर
Chhagan Bhujbal OBC Reservation: ओबीसी आंदोलकाने आयुष्य संपवलं, छगन भुजबळ चिमुकल्या लेकराला छातीशी कवटाळून म्हणाले, 'काही कमी पडलं तर आम्ही आहोत'
Chhagan Bhujbal Latur: छगन भुजबळ यांनी शुक्रवारी ओबीसी आरक्षणासाठी आयुष्य संपवणाऱ्या भरत कराड यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कराड यांच्या चिमुकल्यांना जवळ घेतले.
Chhagan Bhujbal OBC Reservation
1/10

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत महादेव कराड या 35 वर्षीय ओबीसी बांधवाने नदीत उडी मारून आत्महत्या केली होती.
2/10

या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी लातूरच्या वांगदरी जाऊन भरत कराड यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
3/10

मंत्री छगन भुजबळ यांच्या सोबत यावेळी धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते. यावेळी गावकऱ्यांची मोठी गर्दी बघायला मिळाली.
4/10

कराड कुटुंबियांनी अश्रूचा बांध फोडल्याने उपस्थित साऱ्याचे मन गहिवरून आल्याचे चित्र बघायला मिळाले आहे.
5/10

छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी कराड कुटुंबीयांचे सांत्वन केले.
6/10

धनंजय मुंडे कराड कुटुंबीयांच्या भेटीला
7/10

छगन भुजबळ यांनी भरत कराड यांच्या लहान मुलाला प्रेमाने जवळ घेतले.
8/10

छगन भुजबळ यांनी भरत कराड यांच्या कुटुंबाला काहीही कमी पडून देणार नाही, असे आश्वासन दिले.
9/10

छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे.
10/10

छगन भुजबळ हे राज्य सरकारने मराठा आरक्षणाविरोधात काढलेल्या जीआरविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.
Published at : 12 Sep 2025 01:20 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























