एक्स्प्लोर

Kolhapur Airport : कोल्हापूर-बंगळूर मार्गावर उद्यापासून विमानसेवा; दक्षिण भारतासह परदेशात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार

कोल्हापूर-बंगळूर मार्गावर विमानसेवा उद्यापासून म्हणजेच 13 जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. इंडिगो कंपनी (indigo airlines) या मार्गावर सेवा देणार आहे. आठवड्यातील सातही दिवस विमानसेवा उपलब्ध होणार आहे.

Kolhapur Airport : कोल्हापूर-बंगळूर मार्गावर विमानसेवा उद्यापासून म्हणजेच 13 जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. इंडिगो कंपनी (indigo airlines) या मार्गावर सेवा देणार आहे. आठवड्यातील सातही दिवस विमानसेवा उपलब्ध होणार आहे. बंगळूरमधून हे विमान पुढे कोईमतूरला जाईल. त्यामुळे दक्षिणेकडे राज्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक शिक्षण आणि नोकरी निमित्त जाणाऱ्यांसाठी चांगला पर्याय मिळणार आहे. इंडिगो कंपनीकडून (indigo airlines) सध्या कोल्हापुरातून तिरुपती अहमदाबाद आणि हैदराबाद या मार्गावर विमानसेवा पुरविण्यात येत आहे.

या कंपनीने आता बंगळूर मार्गावर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या मार्गावरील विमानसेवा बंद होती.  कोल्हापूर बंगळूर विमानसेवा पूर्ववत करण्यात येईल असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले होते. दरम्यान, बंगळूर आयटी, तर फौंड्री आणि उद्योगांसाठी कोईमतूर प्रसिद्ध असल्याने कोल्हापुरातील  उद्योजक नोकरदार विद्यार्थ्यांची वाहतुकीची चांगली सोय होणार आहे. 

कोल्हापूर विमानतळावरून 20 शहरांना कनेक्टिव्हिटी

कोल्हापूर विमानतळावरून (Kolhapur Airport) आजपासून देशातील 20 महत्त्वाच्या शहरांसाठी कनेक्टिंग विमानसेवा सुरू झाली आहे. इंडिगो एअरलाईन्सकडून कोल्हापूर विमानतळावरून देशातील प्रमुख शहरांना जोडणारी (कनेक्टिंग) विमानसेवा सुरू झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर विमानतळावर येणार्‍या प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध झाली असून उद्योग जगतालाही लाभ होणार आहे. 

कोल्हापूर विमानतळावरून कोल्हापूर-अहमदाबाद, कोल्हापूर-हैदराबाद, कोल्हापूर-बंगळूर आणि कोल्हापूर-तिरूपती या 4 मार्गांवर थेट विमानसेवा इंडिगो एअरलाईन्सकडून नियमितपणे सुरु आहेत. आता उद्यापासून 13 जानेवारीपासून कोल्हापूर ते बंगळूर आणि पुढे कोईमतूर विमानसेवा सुरू होत आहे. कोल्हापूरपासून देशातील काही प्रमुख शहरांसाठी कनेक्टींग फ्लाईट उपलब्ध झाल्या आहेत. त्यानुसार भुवनेश्‍वर, चंदीगड, चेन्नई, कोईमतुर, दिल्ली, गुवाहाटी, इंदूर, जयपूर, कोची, कोलकत्ता, लखनौ, मंगळूर, मुंबई, तिरूअंनतपुरम, त्रिचीरापल्ली आणि विशाखापट्टणम या शहरांसाठी, इंडिगो एअरलाईन्सच्या कनेक्टींग फ्लाईटस् प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. 

कोल्हापूर विमानतळावर चेक इन केल्यानंतर, त्यांना प्रवासाच्या अंतिम ठिकाणापर्यंत बोर्डींग पास मिळेल आणि प्रवाशांचे बॅगेजही परस्पर दुसर्‍या विमानात चढवले जाईल. अंतिम स्थानावर प्रवाशांना त्यांचे लगेज मिळेल. त्यामुळे कोल्हापूर विमानतळावरून प्रवास करणार्‍यांचा प्रवास सुखकर होणार आहे. कोल्हापुरातून देशातील 20 प्रमुख शहरांमध्ये इंडिगो एअरलाईन्सने थेट किंवा अन्य शहरांमार्गे आणि कनेक्टिंग फ्लाईटद्वारे प्रवासी सेवा उपलब्ध केली आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि मानसिक त्रास कमी होणार आहे. आणि ही मोठी पर्वणीच उघोग विश्वासाठी ठरणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Sanjay Raut : रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
Embed widget