Kolhapur Crime : पन्हाळा पंचायत समितीमधील सहाय्यक लेखाधिकार्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले
Kolhapur : फाईल पुढील कार्यवाहीसाठी विना त्रुटी पाठवण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पन्हाळा पंचायत समितीमधील सहाय्यक लेखाधिकार्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.
Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील लाचखोरी सुरुच आहे. आता रस्ते आणि आरसीसी गटार कामाची फाईल पुढील कार्यवाहीसाठी विना त्रुटी पाठवण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पन्हाळा पंचायत समितीतील सहाय्यक लेखाधिकार्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.
अरुण रघुनाथ मांगलेकर (वय 55, रा.मनोरमानगर, देवकर पाणंद, कोल्हापूर) असे लाच घेणारे अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार हे कंत्राटदार आहेत. त्यांनी पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील रस्त्याचे तीन लाखांचे काम केलं आहे. तसेच पन्हाळा तालुक्यातील आरळेतील आरसीसी गटरचेही तीन लाखांचे काम केले आहे. तक्रारदाराने या दोन्ही कामाच्या बिलाची फाईल व रक्कम मिळवण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवला होता.
समितीमधील सहाय्यक लेखा अधिकारी अरुण मांगलेकर यांनी विना त्रुटी दोन्ही फाईल कार्यवाही करण्यासाठी तीन हजारांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने 4 ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला.
आज दुपारी पन्हाळा पंचायत समितीच्या कार्यालयात तीन हजार रुपयांची लाच घेताना सहाय्यक लेखाधिकारी अरुण मांगलेकर यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलिस उपधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक नितीन कुंभार, पोसई संजीव बंबरगेकर, पोहेकॉ शरद पोरे, पोना सुनील घोसाळकर, पोकॉ रुपेश माने, मयूर देसाई, हेकॉ विष्णू गुरव यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या