Aishwarya jadhav kolhapur : कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवची विम्बल्डन स्पर्धेसाठी निवड
कोल्हापूरची टेनिसपटू ऐश्वर्या जाधवची (Aishwarya jadhav kolhapur ) आशियाई टेनिस फेडरेशनच्या वतीने इंग्लंडमध्ये होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेसाठी आशियाई संघात निवड झाली आहे.

Aishwarya jadhav kolhapur : कोल्हापूरची टेनिसपटू ऐश्वर्या जाधवची आशियाई टेनिस फेडरेशनच्या वतीने इंग्लंडमध्ये होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेसाठी आशियाई संघात निवड झाली आहे. या संघात निवड झालेली ऐश्वर्या जाधव भारतातील एकमेव टेनिसपटू आहे.
राजधानी नवी दिल्लीमध्ये झालेल्या वर्ल्ड ज्युनिअर टेनिस स्पर्धेतून आशियाई संघाची निवड करण्यात आली. यामध्ये १४ वर्षांखालील गटातील दोन मुले आणि दोन मुलींची निवड करण्यात आली आहे.
निवड झालेल्या संघामध्ये ऐश्वर्यासह जपानची अझुना इचीओका, कझाकिस्तानची झांगर नुरलानुली आणि कोरियाची सी हॅयुक चो यांचा समावेश आहे. ऐश्वर्या कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनची खेळाडू आहे. ती छत्रपती शाहू विद्यालयात शिकते. ऐश्वर्याला प्रशिक्षक अर्षद देसाई, मनाल देसाई आदींचे मार्गदर्शन लाभत आहे.
कोल्हापूरची टेनिसपटू ऐश्वर्या जाधव सातत्याने ऐतिहासिक कामगिरी करत आहे. फॉर्ममध्ये सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर 13 वर्षीय ऐर्श्वयाने अंडर-14 श्रेणीमध्ये प्रथम क्रमांकावर पोहोचण्याची कामगिरी केली आहे.
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
