एक्स्प्लोर
पिककर्जाची सोपी पद्धत, किसान क्रेडिट कार्ड
मुंबईः शेतकऱ्यांना कर्ज मिळवणं सोपं व्हावं यासाठी किसान क्रेडिट कार्ड ही उपयुक्त योजन शासनाने आणली आहे. शेतकरी बँकेकडून एटीएमप्रमाणे किसान क्रेडिट कार्ड मिळवू शकतात. घेतलेल्या कर्जाचे पैसे लागतील तसे शेतकऱ्यांना वापरता येतात.
शेतकऱ्यांना त्यांचे शेतीसाठीचे खर्च आवश्यकतेनुसार भागवता येणं, हा या योजनेमागचा मुख्य हेतू आहे. एटीएममधून जसे गरजेप्रमाणे पैसे काढू शकतो, तसे किसान क्रेडिट कार्डद्वारे पैसे काढून शेतकरी प्रत्येकवेळी कर्जासाठी प्रत्येक वेळी बँकेत जाण्याचा त्रास वाचवू शकतात.
किसान क्रडिट कार्डसाठी पात्रता
शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी जवळच्या बँकेत संपर्क साधणं गरजेचं आहे. कार्ड मिळवण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःची शेती असणं आवश्यक आहे.शिवाय शेतमजुर, संयुक्त शेती करणारे शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
असा करा अर्ज
शेतकरी किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकांमध्ये अर्ज करु शकतात. सर्व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये यासाठीचे अर्ज उपलब्ध आहेत. याशिवाय शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड वापरण्याच्या अटी आणि नियमही बँकेद्वारे सांगितले जातात. शेतकऱ्यांनी कार्ड घेण्यापूर्वी संबंधित बँकेला आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे.
संबंधित बातमीः
पीक कर्ज कसं मिळतं? त्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
क्राईम
Advertisement