एक्स्प्लोर

Gautam Gambhir Ind vs NZ Final T20 World Cup 2026: 2 भारतीय दिग्गजांना मी हा विश्वचषक समर्पित करतो...; गौतम गंभीरचा मास्टरस्ट्रोक, नेमकं काय म्हणाला?

Gautam Gambhir T20 World Cup 2026: विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी एकत्रित माध्यमांशी संवाद साधला.

Gautam Gambhir T20 World Cup 2026: सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्त्वाखाली टीम इंडियानं आयसीसी टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2026) नवा इतिहास घडवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा 96 धावांनी (Ind vs NZ Final) धुव्वा उडवला. भारताने सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. आयसीसी टी-20 विश्वचषक लागोपाठ दुसऱ्यांदा आणि आजवर तिसऱ्यांदा जिंकणारा टीम इंडिया हा पहिला संघ ठरला.

विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी एकत्रित माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मी हा टी-20 विश्वचषक राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना समर्पित करू इच्छितो, असं गौतम गंभीर म्हणाला. राहुल द्रविड यांनी संघाला या टप्प्यावर आणले. यामध्ये व्हीव्हीएस लक्ष्मणचाही समावेश आहे, ज्यांनी एनसीएमध्ये खेळाडूंची एक मजबूत पिढी तयार केली, असं गौतम गंभीरने सांगितले. 

सूर्यकुमार यादव काय म्हणाला? (Suryakumar Yadav T20 World Cup 2026)

आज जे घडलंय ते पूर्णपणे समजून घ्यायला थोडा वेळ लागेल, पण आजच्या यशामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. हा खूप मोठा आणि लांब प्रवास होता, असं सूर्यकुमार यादवने सांगितले. 2024 च्या विश्वचषकानंतर हा प्रवास सुरू झाला. त्या वेळी जय शाह सर तेव्हा बीसीसीआयचे सचिव, तसेच रोहित शर्मा आणि इतर सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि या कमाल संघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली. त्यानंतरचा हा दीर्घ प्रवास करत नरेंद्र मोदी स्टेडियम येथे येऊन विश्वविजेते होणं ही खूप खास भावना आहे, असं सूर्यकुमार यादवने सांगितले. 

न्यूझीलंडचा डाव कसा राहिला? (Ind vs NZ Final T20 World Cup 2026)

256 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांवर सुरुवातीपासूनच दबाव दिसून आला. टिम सीफर्ट आणि फिन अ‍ॅलन यांनी पहिल्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी केली, पण त्यानंतर कीवी संघाची घसरण सुरू झाली. न्यूझीलंडकडून टिम सीफर्टने सर्वाधिक 52 धावा केल्या. त्याने 26 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकार मारले. मात्र संघातील सात फलंदाज एक अंकी धावसंख्येत बाद झाले. केवळ 72 धावांवर न्यूझीलंडचे पाच फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. डॅरिल मिचेलने 11 चेंडूत 17 धावा केल्या, तर कर्णधार मिचेल सॅन्टनरने 35 चेंडूत 43 धावांची झुंज दिली, पण ती संघाला विजय मिळवून देण्यासाठी अपुरी ठरली. भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेलने 3 विकेट्स घेत न्यूझीलंडच्या फलंदाजीचा कणा मोडला.

संबंधित बातम्या:

Ind vs NZ Final T20 World Cup 2026: सगळ्यांना बाहेर काढलं, खिडकीवरील पडदा लावला...; विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन जय शाह सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीरला कुठे घेऊन गेले?, VIDEO

Hardik Pandya-Mahika Sharma T20 World Cup 2026: मिठी मारली, मैदानात हार्दिक पांड्यासोबत नाचली...; पुढे महिकाने जे केलं संपूर्ण ग्राऊंड स्टाफ बघत बसलं, पाहा PHOTO

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 PBKS vs LSG : नवा राजा, नवा रुबाब! श्रेयससमोर ऋषभ पंतची शरणागती, पंजाबचा विजयरथ सुसाट, तर लखनऊच्या पराभवाची हॅट्रिक
नवा राजा, नवा रुबाब! श्रेयससमोर ऋषभ पंतची शरणागती, पंजाबचा विजयरथ सुसाट, तर लखनऊच्या पराभवाची हॅट्रिक
PBKS vs LSG IPL 2026 : मुल्लानपूरमध्ये पंजाबचा 'गब्बर' विजय! लखनऊचा 54 धावांनी धुव्वा, प्रियांश अन् कॉनोलीनंतर यानसेन चमकला
PBKS vs LSG : मुल्लानपूरमध्ये पंजाबचा 'गब्बर' विजय! लखनऊचा 54 धावांनी धुव्वा, प्रियांश अन् कॉनोलीनंतर यानसेन चमकला
IPL 2026 Points Table : केकेआरचा पहिलाच अन् घातक वार! राजस्थान गुडघ्यावर, पण मुंबई हादरलं, पॉइंट्स टेबलमध्ये ट्विस्ट
केकेआरचा पहिलाच अन् घातक वार! राजस्थान गुडघ्यावर, पण मुंबई हादरलं, पॉइंट्स टेबलमध्ये ट्विस्ट
KKR vs RR IPL 2026 : अखेर वनवास संपला! सलग पराभवांच्या अंधारानंतर रिंकू सिंगने पेटवला केकेआरच्या विजयाचा दिवा; शेवटच्या 5 षटकात गेमच फिरवला
अखेर वनवास संपला! सलग पराभवांच्या अंधारानंतर रिंकू सिंगने पेटवला केकेआरच्या विजयाचा दिवा; शेवटच्या 5 षटकात गेमच फिरवला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Maharashtra Live blog updates: शेतकरी व राजकीय व्यक्तींसाठी बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जाहीर
Maharashtra Live blog updates: शेतकरी व राजकीय व्यक्तींसाठी बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जाहीर
Bigg Boss Marathi 6 Tanvi Kolte: सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..
सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..
Ahilyanagar Crime News: 'मी आत्मज्ञानी.. मंत्र तंत्राचा बाप, माझ्याकडे दैवीशक्ती' अटकेनंतर भोंदू गडगे महाराज नको नको ते बरळला, पोलिसांसमोर छातीठोकपणे म्हणाला....
'मी आत्मज्ञानी.. मंत्र तंत्राचा बाप, माझ्याकडे दैवीशक्ती' अटकेनंतर भोंदू गडगे महाराज नको नको ते बरळला, पोलिसांसमोर छातीठोकपणे म्हणाला....
Bhendwal Bhavishyvani 2026: जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज जाहीर, A टू Z माहिती
जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळचा अंदाज जाहीर, A टू Z माहिती
एकतर करार स्वीकारा, नाहीतर पूर्णपणे नष्ट करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इराणला इशारा 
एकतर करार स्वीकारा, नाहीतर पूर्णपणे नष्ट करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इराणला इशारा 
धक्कादायक! सलग दुसऱ्या दिवशी तामिळनाडूत मोठा अपघात, फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, आत्तापर्यंत 16 महिलांसह 23 जणांचा मृत्यू 
धक्कादायक! सलग दुसऱ्या दिवशी तामिळनाडूत मोठा अपघात, फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, आत्तापर्यंत 16 महिलांसह 23 जणांचा मृत्यू 
Tanvi Kolte : बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
Embed widget