Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : बुमराहबद्दल काही न लिहिलेलंच बरं…; टीम इंडिया चॅम्पियन अन् MS धोनीची पोस्ट, सोशल मीडियावर खळबळ; गौतम गंभीरबद्दल काय बोलला?
India’s T20 World Cup Win : आपल्या घरच्या मैदानावर प्रथमच एखाद्या संघाने ही ट्रॉफी जिंकली आणि सलग दोन वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा भारत पहिलाच देश ठरला.

MS Dhoni message for Gautam Gambhir : भारतीय संघाने आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकत इतिहास रचला. आपल्या घरच्या मैदानावर प्रथमच एखाद्या संघाने ही ट्रॉफी जिंकली आणि सलग दोन वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा भारत पहिलाच देश ठरला. या स्पर्धेत अनेक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाले, पण सर्वात जास्त चर्चा रंगली ती मैदानाबाहेरील एका पोस्टची. अहमदाबादमध्ये भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत तिसरी टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली. त्यानंतर काही मिनिटांतच दिग्गज महेंद्रसिंग धोनी याने सोशल मीडिया मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे मनापासून आभार मानले.
फायनल सामन्यादरम्यान धोनी व्हीव्हीआयपी बॉक्समध्ये रोहित शर्मा आणि जय शाह यांच्यासोबत दिसले. सामन्यानंतर त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आणि त्यामुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली.
गौतम गंभीरबद्दल MS धोनी काय म्हणाला? (MS Dhoni On Gautam Gambhir)
टीम इंडियाचा अभिनंदन करताना MS धोनी म्हणाला की, अहमदाबादमध्ये इतिहास रचला गेला आहे. भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि जगभरातील भारतीय क्रिकेट चाहत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. तुम्हा सगळ्यांना खेळताना पाहणे खरोखरच आनंद झाला.
गौतम गंभीरबद्दल बोलताना धोनी म्हणाला, कोच साहेब, तुमच्या चेहऱ्यावरचं स्मित खूप छान आहे. स्मितहास्यासोबत असलेली ती प्रखरता म्हणजे खरोखरच जबरदस्त कॉम्बिनेशन! खूप छान कामगिरी. मजा करा, हा क्षण एन्जॉय करा…
View this post on Instagram
गौतम गंभीरच्या विजयावर केलेल्या या हलक्याफुलक्या टिप्पणीने 2007 च्या चॅम्पियन संघ आणि 2026 च्या विजेत्यांमध्ये एक भावनिक दुवा निर्माण केला. सोशल मीडियावर अनेकदा धोनी आणि गंभीर यांच्यात फारशी मैत्री नसल्याच्या चर्चा रंगतात, मात्र दोघांनीही वेळोवेळी त्या अफवा चुकीच्या ठरवल्या आहेत.
‘चॅम्पियन’ गोलंदाजाचंही कौतुक (MS Dhoni On Jasprit Bumrah)
धोनीच्या पोस्टमधील सर्वात लक्षवेधी भाग म्हणजे भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचं कौतुक. बुमराह याने 4/15 अशी भेदक गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या टॉप ऑर्डरचा धुव्वा उडवला. यावर धोनीने लिहिलं, बुमराहबद्दल काही न लिहिलेलंच बरं… चॅम्पियन गोलंदाज. म्हणजेच, बुमराहच्या कामगिरीचं वर्णन शब्दांत करणं कठीण असल्याचा त्यांनी सूचक उल्लेख केला.
फायनलमध्ये टीम इंडियाविरुद्ध न्यूझीलंडचा सामना कसा राहिला? (Ind vs NZ Final T20 World Cup 2026)
हा सामना जवळजवळ एकतर्फी ठरला. भारताने प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसन (89) आणि अभिषेक शर्मा (52) यांच्या तुफानी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. भारतीय फलंदाजांनी 5 बाद 255 धावांचा प्रचंड डोंगर उभा केला, जो टी-20 वर्ल्ड कप फायनलमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा स्कोर ठरला.
या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ कधीच लयीत दिसला नाही. अखेर कीवी संघ 19 षटकांत 159 धावांवरच गारद झाला. बुमराह आणि अक्षर पटेल याने घेत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
हे ही वाचा -




















