(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Accident Alert Sensor : जालन्यातल्या युवकाचा भन्नाट शोध, अपघात झाल्यावर लगेच येणार कॉल अलर्ट आणि लोकेशन
Jalna News : या सेन्सरमुळे अपघात होताच त्या अपघातस्थळाची नेमकी माहिती मिळणार आहे. त्यामुळे अपघातग्रस्ताचा जीव वाचू शकणार आहे.
जालना : रस्त्यावर ठिकठिकाणी अनेक वेळा अपघात होत असतात. कधी कधी याची लगेच माहिती मिळत नाही, परिणामी वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो. मात्र यावर उपाय म्हणून जालन्यातल्या एका युवकानं अॅक्सिडेंट अलर्ट सेन्सर (Accident Alert Sensor) बनवलं आहे. ज्यामुळे तत्काळ अपघाताची माहिती आणि ठिकाण एकाच वेळी पोलीस, रुग्णवाहिका आणि नातेवाईकांना समजणार आहे. राजेंद्र पाचफुले असं या युवकाचं नाव असून त्याच्या या कामाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जातं आहे.
अपघात झाला म्हणजे सर्व इमर्जन्सी सुविधांना प्रश्न पडतो तो म्हणजे अपघात नेमका कुठे झाला. त्यामुळे घटनास्थळाची अचूक आणि तात्काळ मिळणारी माहितीच अपघातग्रस्तांचा जीव वाचवू शकते. याच गरजेपोटी जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील दुधपुरी गावच्या राजेंद्र पाचफुले या युवकानं एक अॅक्सिडेंट अलर्ट सेन्सर बनवलंय. त्याच्या या शोधाने अपघात झाल्यावर तात्काळ पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका आणि गाडी मालकाच्या कुटुंबियांना तात्काळ कॉल आणि लोकेशन मिळणार आहे.
राजेंद्रने यासाठी अॅक्सिडेंट अलर्ट सिस्टीम ग्लोबल कम्युनिकेशन आणि ग्लोबल पोजिसिंग सिस्टीम तंत्राचा वापर केला. यात जीपीएस, अँड्रॉइड, जीएसएम आणि कोडिंग सॉफ्टवेअर सेन्सर्सचा बसवण्यात आले. ही किट दुचाकीला बसवून त्याने 55 ते 60 किमी प्रतितास वेगाने दुचाकीचा अपघात घडवून आणला. या चाचणी दरम्यान दुचाकीला अपघात होताच सिस्टिमधील व्हायब्रेट सेंसर अॅक्टिव्ह झाले. त्यानंतर अँड्रॉइड आरडीओ सिस्टीम अॅक्टिव्ह होऊन जीपीएस सिस्टीमला आणि जीपीएस सिस्टीमने जीएसएम सिस्टिम अॅक्टिव्ह केले. यानंतर त्याच्या मोबाईलवर टेक्स्ट मॅसेज, कॉल आणि अपघाताचे लाईव्ह लोकेशन देखील मिळाल.
राजेंद्रच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे. दोन एकर शेतात आई-वडील कष्ट करून घराचा गाडा हाकतात. बीए दृतीय वर्षात शिकणाऱ्या राजेंद्रने तीन महिन्याचा स्कील डेव्हलपमेंटचा कोर्स केला. त्यातूनच त्याला तांत्रिक माहिती अवगत झाली आणि आपल्या कल्पनेतल्या प्लॅन त्याने प्रत्यक्षात साकार केला. यासाठी त्याला 5 हजार रुपये खर्च आला.
देशभरात रस्त्यांवर अनेक अपघात होत असतात. कित्येक वेळा अपघातांची प्रशासनाला वेळेवर माहिती न मिळाल्याने अनेकांचा हकनाक जीव गमावावा लागतो. त्यामुळे राजेंद्रच्या या प्रयोगाच व्यापक संशोधन झाल्यास या अलर्ट सिस्टीममुळे कित्येक जणांचे जीव वाचू शकतील.
ही बातमी वाचा :