एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सावधान : तुमच्या फोनद्वारे कोरोनाची लागण होऊ शकते, म्हणून सतत स्वच्छ करा मोबाईल फोन
आपल्या हातात दिवसभर असणाऱ्या मोबाईलवरही कोरोनाचा विषाणू बसू शकतो. त्यामुळे मोबाईलच्या माध्यमातून कोरोना व्हायरसचा धोका निर्माण होऊ शकतो.
नवी दिल्ली : कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र घाबरुन न जाता काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्या हातात दिवसभर असणाऱ्या मोबाईलवरही कोरोनाचा विषाणू बसू शकतो. त्यामुळे मोबाईलच्या माध्यमातून कोरोना व्हायरसचा धोका निर्माण होऊ शकतो.
स्मार्टफोनमधून व्हायरस पसरतो
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते कोरोना व्हायरस कोठूनही लोकांमध्ये पसरू शकतो. एका अहवालानुसार आपण आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनला वारंवार स्पर्श केल्यास आपल्या चेहऱ्याला स्पर्श करण्यापूर्वी आपले हात नीट धुतले पाहिजे. कारण, आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवरुनही,कोरोना व्हायरस आपल्यामध्ये प्रवेश करू शकतो. कोरोना विषाणू सुमारे 1 आठवड्यापर्यंत निर्जीव पृष्ठभागावर जगू शकतात. तसेच, ते कफ किंवा शिंकाच्या स्वरूपात मानवी शरीरातून बाहेर येते. विषाणूचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका म्हणजे संक्रमित व्यक्तीशी थेट संपर्क साधणे.
दर दीड तासांनी आपला फोन साफ करा
फोर्टिस रूग्णालयाचे डॉ. रविशंकर झा म्हणाले की, आपला स्मार्टफोन 90 मिनीटानंतर सॅनिटायजरने स्वच्छ केला पाहिजे. तुम्ही जर सतत फोन वापरत असाल तो हात आपल्या चेहऱ्याला लावला नाही पाहिजे.
टॉयलेट सीटपेक्षा जास्त खराब मोबाईल
2018 मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार आपला स्मार्टफोन टॉयलेट सीटपेक्षा तीन पट जास्त बॅक्टेरिया आपल्या फोनवर असतो. वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार मोबाईल ठेवल्यामुळे किंवा पकडल्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरस मोबाइल फोनमध्ये मोठ्या प्रमाणात असतात. इन्शुरन्स गो या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार 6 महिन्यात 20 पैकी एक व्यक्ती आपला मोबाईल साफ करतात.
स्मार्टफोनमधून व्हायरस कसे दूर करावे?
तज्ज्ञांचा विश्वास आहे की, अल्कोहोलने मोबाईल स्वच्छ केल्यास व्हायर दूर होऊ शकतो. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्याचा सल्ला देखील दिला आहे.
Best Bus Cleaning | कोरोनामुळे बेस्टच्या बस स्वच्छतेत वाढ, लोकलप्रमाणे बसचंही निर्जंतुकीकरण
संबंधित बातम्या :
Coronavirus | इटलीमध्ये 24 तासांत 368 जणांचा मृत्यू; जाणून घ्या कोणत्या देशात काय परिस्थिती?
Coronavirus | ख्रिस्तियानो रोनाल्डो कोरोनाग्रस्तांसाठी आपल्या हॉटेल्सचं रूपांतर हॉस्पिटल्समध्ये करणार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
क्रीडा
व्यापार-उद्योग
Advertisement