Coronavirus | इटलीमध्ये 24 तासांत 368 जणांचा मृत्यू; जाणून घ्या कोणत्या देशात काय परिस्थिती?
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात भितीचं वातावरण पसरलं आहे. अशातच चीनमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत घट आली असून इटलीमध्ये मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे चीननंतर इटलीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे. इटलीमध्ये कोरोनामुळे मागील 24 तासांमध्ये 368 जणांचा मृत्यूल झाला आहे. तसेच चीनमध्ये मागील 24 तासांमध्ये फक्त 14 जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये जरी कोरोनाचा कहर कमी होत असेल तरी इटलीमध्ये मात्र कोरोनामुळे परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. जगभरात आतापर्यंत 6515 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 157 देशांमध्ये 1 लाख 69 हजार 500 एवढी कोरोनाबाधितांची संख्या आहे.
Coronavirus | कोल्हापुरात कोरोना संशयित वृद्ध नागरिकाचा मृत्यू
इटलीमध्ये 1809 लोकांचा मृत्यू, चीनमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट
चीननंतर कोरोना व्हायरसचा सर्वाधिक परिणाम इटलीमध्ये पाहायला मिळत आहे. येथे आतापर्यंत कोरोनामुळे 1809 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे 3509 नवीन रूग्ण समोर आले आहेत. आतापर्यंत इटलीमध्ये एकूण 24, 747 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 2335 लोक या व्हायरसमुळे बरेही झाले आहेत. इटलीमध्ये गेल्या 14 तासांत जवळपास 368 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इटलीमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पार्कमध्ये जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे. तसेच इतरही निर्बंध लावण्यात आले आहेत.
दरम्यान, चीनमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा हा सर्वाधिक आहे. चीनमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 3214 लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु, कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाल्याचं दिसून येत आहे. मागील 24 तासांमध्ये येथए फक्त 14 कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर आधीपासून संक्रमित लोकांमधील 14 जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये आतापर्यंत 67 हजारांपेक्षा अधिक लोक कोरोनामधून बरे झाले आहेत.
पाहा व्हिडीओ : कोरोना व्हायरसचा राज्यभरातील देवस्थानांवर परिणाम, कोरोनाचे साईड इफेक्ट्स
इराणमध्ये 1209 कोरोना बाधित, मागील 24 तासांत 113 लोकांचा मृत्यू
इटलीनंतर इराणमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. येथे मागील 24 तासांमद्ये 113 लोकांचा मृत्यू झाला आहे. इराणमध्ये आणखी 1209 कोरोना बाधित आढळून आले असून जवळपास 14 हजार लोक कोरोनाने संक्रमित आहेत. दरम्यान, 4500 लोक कोरोनामधून बरेदेखील झाले आहेत. इराणमध्ये या महामारीमुळे लोक घराबाहेर पडत नाहीत. कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाण बंद करण्यात आले आहेत. येथे दोन वेळा वेगवेगळ्या कारागृहांमधून हजारो कैद्यांना सोडून देण्यात आलं आहे.
24 तासांमध्ये स्पेनमध्ये 96 तर फ्रान्समध्ये 36 लोकांचा मृत्यू
स्पेन आणि फ्रान्समध्ये कोरोनामुळे मत्यूतांडव सुरूच आहे. स्पेनमध्ये मागील 24 तासांमध्ये 96 तर फ्रान्समध्ये 36 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत स्पेनमध्ये 292 तर फ्रान्समध्ये 127 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये 7800 हून अधिक कोरोना बाधित आहेत. तर फ्रान्समध्ये 5400 पेक्षा अधिक लोक कोरोना बाधित आहेत. दरम्यान, स्पेनचे पंतप्रधान यांच्या पत्नीदेखील कोरोनाबाधित आहेत.
अमेरिकेत 24 तासांत 11 जणांचा मृत्यू, 771 जणांना कोरोनाची बाधा
जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेतही कोरोनाने हैदोस घातला आहे. गेल्या 24 तासांत अमेरिकेमध्ये कोरोनामुळे 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत अमेरिकेमध्ये एकूण 68 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 771 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये एकूण 3714 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान, अमेरिकेने युरोपातील नागरिकांवर अमेरिकेत येण्यावर बंदी घातली आहे. तसेच अमेरिकेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील कोरोनाची तपासणी केली असून त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. कोरोनामुळे अमेरिकेतील अनेक मोठे इव्हेंट्स रद्द करण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या :
Coronavirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रियांका-दीपिकाकडे WHOचे डायरेक्टर डॉक्टर टेड्रोस यांचं अपील
Coronavirus | पुण्यात आणखी एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला, राज्यातील आकडा 33 वर
Coronavirus | शेतकरी कर्जमाफी योजनेलाही कोरोना व्हायरसचा फटका