Coronavirus | ख्रिस्तियानो रोनाल्डो कोरोनाग्रस्तांसाठी आपल्या हॉटेल्सचं रूपांतर हॉस्पिटल्समध्ये करणार?
जगभरात कोराना व्हायरसनं हैदोस घातला असतानाच रोनाल्डो आपल्या CR7 ब्रँडच्या सर्व हॉटेल्सचं रूपांतर हॉस्पिटल्समध्ये करणार असल्याचं वृत्त सर्व माध्यमांनी प्रसारित केलं होतं. पण यामध्ये कितपत तथ्य आहे?
![Coronavirus | ख्रिस्तियानो रोनाल्डो कोरोनाग्रस्तांसाठी आपल्या हॉटेल्सचं रूपांतर हॉस्पिटल्समध्ये करणार? Coronavirus football superstar ronaldo hotels to be converted into hospitals to help fight new covid 19 report Coronavirus | ख्रिस्तियानो रोनाल्डो कोरोनाग्रस्तांसाठी आपल्या हॉटेल्सचं रूपांतर हॉस्पिटल्समध्ये करणार?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/17231021/RONALDO.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लिस्बन : जगभरात कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. चीनमधून पसरलेला हा आजार संपूर्ण जगासाठी डोकेदुखी ठरला आहे. अशातच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनेदेखील या आजाराला जागतिक महामारी म्हणून घोषित केलं आहे. एवढचं नाहीतर अनेक देशांनी शाळा, महाविद्यालयं, मॉल्स, बाजारपेठा आणि गर्दीची ठिकाणं बंद करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी नागरिकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आजारामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
महामारी म्हणून घोषित करण्यात आलेल्या कोरोना व्हायरसच्या विरोधात संपूर्ण जग लढत असताना यामध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोनेही सहभाग घेतला असल्याचं वृत्त सगळीकडे प्रसारित करण्यात येत आहे. स्पेनमधील मार्का वृत्तपत्रानुसार, 'स्टार फुटबॉलर रोनाल्डोने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पोर्तुगालमध्ये असलेले आपल्या CR7 ब्रँडचे सर्व हॉटेल्सचं रूपांतर हॉस्पिटल्समध्ये केलं आहे. या हॉस्पिटलमध्ये कोरोना व्हायरसने बाधित असलेल्यांवर मोफत उपचार केले जाणार असल्याचाही निर्णय रोनाल्डोने घेतला आहे. तसेच रोनाल्डोच्या हॉस्पिटल्समध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सचे पगारही रोनाल्डो देणार आहे.'
दरम्यान, स्पेनच्या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनंतर, पोर्तुगालचे पत्रकार फिलिप केटानोने रोनाल्डोने असं कोणतंही पाऊल उचललेलं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच रोनाल्डोच्या हॉटेल्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही हे वृत्त फेटाळून लावलं आहे.
स्पेनमधील वृत्तपत्र मार्काने प्रसिद्ध केलेलं वृत्त सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवलं आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोचे दोन हॉटेल्स आहेत. एक लिस्बनमध्ये आणि दुसरं मदीरा येथे आहे. मदीरा येथेच ख्रिस्तियानो रोनाल्डोचं घर आहे. येथेच रोनाल्डोने स्वतःला आयसोलेशनमध्ये ठेवलं आहे. कारण ज्युवेंट्स क्लबमधील त्याचा सहकारी डेनिएल रूगानीला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.
कोरोनाच्या महामारीचा फटका क्रिडाविश्वालाही बसला आहे. अशातच अनेक सेलिब्रिटींसह खेळाडूही नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. पण प्रसिद्ध फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोने याहीपेक्षा पुढे जाऊन कोरोना ग्रस्तांना मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे. सध्या पोर्तुगालचा स्टार कर्णधार आणि ज्युवेंट्स क्लबचा खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो सीरि ए लीग कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द झाल्यामुळे मायदेशी परतला आहे. रोनाल्डो सध्या आपल्या कुटुंबियांसोबत आहे. रोनाल्डोने आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून एक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना कोरोनापासून दूर राहण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
रोनाल्डोने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'आज जग कठीण प्रसंगातून जात आहे. अशावेळी प्रत्येकानं स्वतःची नेहमीपेक्षा अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. मी आज तुमच्याशी एक फुटबॉलपटू म्हणून नव्हे, तर एक मुलगा, एक बाप म्हणून सवांद साधत आहे. मी सर्वांना विनंती करतो की जागतिक आरोग्य संघटनेनं ( WHO) केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा. एखाद्याचं आयुष्य वाचवणे हे प्राधान्य आहे.'
संबंधित बातम्या :
Coronavirus | आयपीएलचा तेरावा सीझन लांबणीवर, 15 एप्रिलपासून सुरुवात होणारIND Vs SA, Coronavirus | भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यांची मालिका रद्द
VIDEO | ...जेव्हा हिंदी डायलॉग बोलताना क्रिस गेलची जीभ घसरते
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)