Yahoo Search Engine : इंटरनेटच्या सर्चमध्येही मोदी अव्वल स्थानी, ममता बॅनर्जी, आर्यन खानचाही यादीत समावेश
Yahoo Search Engine Modi : याहूने 2021 या वर्षात सर्वाधिक सर्च केलेल्या व्यक्तींची यादी जाहीर केली असून त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथम क्रमांकावर असून ममता बॅनर्जी तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
Yahoo Search Engine Modi : 'हर हर मोदी, घर घर मोदी' अशी घोषणा ज्यांच्यावरुन देण्यात येते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आता 2021 सालच्या इंटरनेटच्या सर्चमध्येही अव्वल स्थानी आहेत. याहूने 2021 या वर्षात सर्वाधिक सर्च केलेल्या व्यक्तींची यादी जाहीर केली असून त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथम क्रमांकावर आहेत तर या यादीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
याहूने या वर्षी भारतीयांकडून इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केलेल्या व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली दुसऱ्या स्थानी आहे तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या विजयानंतर ममता बॅनर्जी यांनी आता देशपातळीवर भाजपला आव्हान देण्याची तयारी सुरु केली आहे. गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने पहिल्या क्रमांकावर आहेत.
या यादीच्या चौथ्या क्रमांकावर दिवंगत टीव्ही मालिका अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आहे. सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणामध्ये एनसीबीकडून अटक करण्यात आलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा या यादीत समावेश आहे. दाक्षिणात्य अभिनेता पुनीत राजकुमार यांचा अकाली मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नावानेही मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आले आहेत.
बॉलिवूडच्या अभिनेत्रींच्या यादीत करीना कपूर पहिल्या क्रमांकावर असून दुसऱ्या क्रमांकावर प्रियांका चोप्रा, तिसऱ्या क्रमांकावर आलिया भट तर चौथ्या क्रमांकारवर दीपिका पादुकोन आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- LinkedIn : नोकरी, Job Search होणार आणखी सोपं, LinkedIn आता हिंदी भाषेमध्येही
- सावधान! Google वर सर्च करु नका कस्टमर केअरचा नंबर, SBI ने जारी केला अलर्ट
- Google For India : सर्च रिझल्ट आता वाचण्याची गरज नाही, Google बोलून दाखवणार, जबरदस्त फीचर येणार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha