सावधान! Google वर सर्च करु नका कस्टमर केअरचा नंबर, SBI ने जारी केला अलर्ट
Online Fraud Google search : गुगलचा फायदा घेत फसवणूक होत असल्याचेही प्रकार समोर आले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या 40 कोटी ग्राहकांसाठी अलर्ट जारी केलाय.
Online Fraud Google search : एखाद्या गोष्टींबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर बहुतेकजण गुगलमध्ये सर्च करतात. पण गुगलचा फायदा घेत फसवणूक होत असल्याचेही प्रकार समोर आले आहेत. त्यामुळेच स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या 40 कोटी ग्राहकांसाठी अलर्ट जारी केलाय. एसबीआयने आपल्या ग्राहकांना बनावट संकेतस्थळापासून सावध राहण्याचा सल्ला दिलाय. त्याशिवाय, कस्टमर केअरचा नंबर सर्च करतानाही सावधानता बाळगायला सांगितलेय. अनेकजण बनावट संकेतस्थळ अथवा मोबाईलक्रमांकाच्या मदतीने फसवणूक करतात. त्यामुळेच एसबीआयकडून सावधानतेचा इशारा दिलाय.
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सावधानतेचा इशारा देताना म्हटलेय की, Google Search इंजनमध्ये मिळालेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कस्टमर केअरच्या नंबरवर फोन करताना फसवणूक होण्याची शक्यता आहे. एसबीआयने ग्राहकांसाठी एक परिपत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये त्यांनी लोन संदर्भातील माहितीसाठी एसबीआय बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरील टोल फ्री क्रमांकाचा वापर करण्याची विनंती केली आहे. त्याशिवाय, आपल्या खात्यासंदर्भात अथवा डेबिट, क्रेडिट कार्डची माहिती कोणालाही देऊ नका. कोणत्याही अज्ञात क्रमांकावरुन माहितीसाठी फोन आल्यास बळी पडू नका. बँक खात्यासंदर्भात माहिती दिल्यास तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे, असं एसबीआयनं म्हटलेय.
बँक कस्टमर केअरचा नंबर सर्च करु नका –
कोणत्याही परिस्थितीत कधीच गुगल/इंटरनेटवर बँक कस्टमर केअरचा नंबर सर्च करु नका. त्याशिवाय एसबीआयच्या बनावट मेल आयडीपासूनही सावध राहण्याचा सल्ला एसबीआयने दिलाय.
एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल –
एसबीआयने एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल केलाय. 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम एटीएममधून काढत असाल तर बँकेत रजिस्टर असणाऱ्या नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतरच 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येईल, असं एसबीआयने म्हटलेय.
काय सावधानता बाळगावी लागेल?
Google वर SBI कस्टमर केअरचा नंबर चुकीचा आहे. या नंबरमार्फत फसवणूक होण्याची शक्यता आहे. अशात एसबीआय ग्राहकांना बनावट मेलपासूनही सावधानता बाळगावी लागेल. ग्राहकांनी आपलं बँक खाते क्रमांक, एटीएम कार्ड क्रमांकासह इतर माहिती कुणासोबतही शेअर करु नये. जर बनावट फोन अथवा मेसेज आला तर लगेच 155260 या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार दाखल करावी.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha