(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Google For India : सर्च रिझल्ट आता वाचण्याची गरज नाही, Google बोलून दाखवणार, जबरदस्त फीचर येणार
Google For India : गूगल आता लवकरच एक असं फीचर आणणार आहे. जे आपल्याला सर्च रिझल्टची माहिती वाचून दाखवणार आहे. ते देखील पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये...
Google For India: प्रत्येक वर्षी होणारा Google For India इव्हेंट आज सुरु झाला आहे. या इव्हेंटमध्ये गूगल इंडियाकडून भारतासाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. गूगल लवकरच असं एक फीचर आणणार आहे ज्यात आपण सर्च केलेली माहिती आपल्या मोठ्या आवाजात ऐकायला मिळणार आहे. या फीचरची घोषणा गूगल फॉर इंडिया इव्हेंटच्या सातव्या (Google For India Event) कार्यक्रमात गूगल सर्चचे व्हाईस प्रेसिडेंट पांडू नायक यांनी दिली आहे. हा कार्यक्रम ऑनलाईन पार पडला. या कार्यक्रमात गूगलनं अनेक फीचर्स आणि महत्वाच्या अपडेट्ससंदर्भात घोषणा केल्या आहेत.
Safer With Google : 'गुगल तो अपना है'; आता आपलं इंटरनेट होणार अधिक सुरक्षित, जाणून घ्या कसं ते
5 भाषांमध्ये ऐकू शकणार सर्च रिझल्ट
गूगलचं हे ग्लोबल फर्स्ट फीचर त्या लोकांना लक्षात घेऊन बनवलं आहे जे लोकं ऐकूण गोष्टी समजू इच्छितात. या फीचरअंतर्गत आपण गूगल असिस्टंटला सर्च रिझल्ट वाचून दाखवण्याची विनंती करु शकणार आहात. हे फीचर ड्रायव्हिंगच्या वेळी देखील महत्वाचं ठरणार आहे. ड्रायव्हिंगच्या वेळी आपल्याला कुठली माहिती हवी असेल तर आपण ती स्क्रिनकडे न पाहता ऐकू शकणार आहोत. हा सर्च रिझल्ट आपण पाच भाषांमध्ये ऐकू शकणार आहोत.
अंध लोकांसाठी अत्यंत उपयोगी
गूगलचं हे फीचर त्या लोकांसाठी फार महत्वाचं ठरणार आहे जे अंध आहेत. जे लोकं पाहू शकत नाहीत, वाचू शकत नाहीत त्यांना माहिती ऐकण्याची व्यवस्था या अॅपमुळं होणार आहे.
या फीचर्सची देखील घोषणा
या कार्यक्रमात कंपनीनं गूगलच्या माध्यमातून कोरोना वॅक्सिनेशन साठी स्लॉट बुक करण्याच्या सुविधेची देखील घोषणा केली आहे. सोबतच गूगल सर्च, जीमेल, गूगल ड्राइव्ह आणि अन्य गूगल अॅप्सच्या अपडेटचीही माहिती दिली आहे.
Youtube Shorts देखील लॉन्च
या इव्हेंटमध्ये कंपनीनं Youtube Shorts हे अॅप देखील लॉन्च केलं आहे. आतापर्यंत हे एक फीचर यू-ट्यूब वर दिसायचं. मात्र आता याला वेगळ्या पद्धतीनं यूजर वापरु शकणार आहेत. हे एक टिकटॉक सारखं अॅप असणार आहे. इथं यूजर्स छोटे व्हिडीओ शूट करुन शेअर करु शकतील. इथं व्हिडीओची कमाल मर्यादा ही 60 सेकंदांची असेल.
कंपनीनं म्हटलं आहे की, आपण सोबत इथवरचा प्रवास केला आहे. यावेळी आम्ही आपल्याला अधिकाधिक प्रोडक्ट्स अपडेट्स, अधिकाधिक टेक्नोलॉजी इनोवेशन्स आणि भारताच्या उत्तम डिजिटल प्रवासाच्या कमिटमेंटसोबत भेटणार आहोत.