एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महिलांना लग्नानंतर पासपोर्टवरील नाव बदलण्याची गरज नाही : मोदी
नवी दिल्ली : महिलांना लग्नानंतर पासपोर्टवरील नाव बदलण्याची गरज नाही. आहे तेच नाव कायम ठेवून महिला लग्नानंतरही पासपोर्टचा वापर करु शकतात, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
महिलांना पासपोर्ट काढण्यासाठी लग्न किंवा घटस्फोटाची कागदपत्र देण्याची गरज नाही, असंही मोदींनी स्पष्ट केलं. त्यामुळे महिलांना लग्नानंतर पासपोर्टवरील नाव बदलायचं की नाही, याचं स्वातंत्र्य असेल.
इंडियान मर्चंट चेंबर्सच्या महिलांना मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदींद्वारे संबोधित केलं. या कार्यक्रमात मोनी महिलांसाठीचा हा निर्णय जाहीर केला. लग्नानंतर महिलांना पासपोर्टवरील नाव बदलण्यासाठी वेगवेगळ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. यामध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
मोदींनी या कार्यक्रमात महिलांसाठी आखलेल्या विविध योजनांचाही उल्लेख केला. महिलांची प्रसुती रजा 12 आठवड्यांवरुन केली, तर गरोदर मातेला प्रसुतीनंतर 6 हजार रुपये देण्याची योजना सुरु केल्याचंही मोदींनी सांगितलं.
उज्ज्वला गॅस योजनेचा 2 कोटी महिलांना लाभ
मोदींनी उज्ज्वला गॅस या योजनेचाही उल्लेख केला. सरकारने येत्या दोन वर्षात पाच कोटी बीपीएल धारक कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्याचं नियोजन केलं आहे. या योजनेचा पहिल्याच वर्षी दोन कोटी महिलांना लाभ झाला, असंही मोदींनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
राजकारण
राजकारण
Advertisement