Sonia Gandhi : राहुल गांधींचं लग्न करा, सोनिया गांधी म्हणाल्या तुम्ही मुलगी शोधा; वाचा नेमकं काय घडलं....
Rahul Gandhi Marriage : राहुल गांधी यांचे लग्न करा, असं एका महिला शेतकऱ्याने सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना सांगितले. यावर सोनिया गांधी यांनी खूप मजेशीर उत्तर दिलं आहे.
Rahul Gandhi Marriage : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या लग्नासंदर्भात सातत्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असते. मध्यमंतरी राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी देखील राहुल गांधी यांना लग्न करण्याचा सल्ला दिला होता. आता पुन्हा एकदा राहुल गांधींच्या लग्नाचा मुद्दा चर्चेत आला आहे. राहुल गांधी यांचे लग्न करा, असं एका महिला शेतकऱ्याने सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना सांगितले. यावर सोनिया गांधी यांनी खूप मजेशीर उत्तर दिलं आहे. तुम्हीच राहुल गांधींसाठी मुलगी शोधा असं उत्तर सोनिया गांधी यांनी त्या महिलेला दिलं. यानंतर उपस्थित असलेल्या सर्व महिला शेतकऱ्यांमध्ये एकच हशा पिकला.
महिला शेतकऱ्यांनी दिल्लीतील 10 जनपथ या निवासस्थानी घेतली सोनिया गांधींची भेट
हरियाणातील सोनीपत येथील काही महिला शेतकऱ्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यासह राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची दिल्लीतील त्यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सोनिया गांधींसह राहुल गांधी आणि प्रियांका गांधी महिला शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. तसेच या महिला शेतकऱ्यांसोबत सोनिया गांधींसह राहुल गांधी आणि प्रियंका गांधीं यांनी जेवण केले. तसेच त्यांच्यासोबत डान्सही केला. यादरम्यान एक मजेदार घटना घडली, जेव्हा सोनिया गांधी यांच्या शेजारी बसलेल्या एका महिला शेतकऱ्याने राहुलचे लग्न करा असे सोनिया गांधी यांना सांगितले. त्यावेळी तुम्हीच मुलगी शोधा असे उत्तर सोनिया गांधी यांनी दिले.
जब एक महिला ने श्रीमती सोनिया गांधी जी से पूछा-
— Congress (@INCIndia) July 29, 2023
राजीव गांधी जी के जाने के बाद आपने पार्टी और परिवार की जिम्मेदारी कैसे संभाली?
सुनिए उनका जवाब-
पूरा वीडियो: https://t.co/RcxM1PrzRB pic.twitter.com/BqBWKjKqxW
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी हरियाणातील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्याचबरोबर त्यांच्या समस्या जाणून घेत भात लावणीही केली होती. यावेळी त्यांनी या शेतकरी महिलांना सोनिया गांधी आणि बहीण प्रियांका यांच्यासोबत आपल्या घरी जेवणाचं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं होतं. त्यानंतर दिल्लीतील राहुल गांधी यांच्या घरी काही महिला शेतकऱ्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी गावरान पद्धतीचे जेवण गांधी परिवासाराठी आणले होते. त्यामध्ये गावरान तूप, गोड लस्सी या पदार्थांचा सामावेश होता. त्यांच्याशी गप्पागोष्टी आणि डान्सचा केलेल्याचा व्हिडिओ राहुल गांधी यांनी ट्वीटरवर शेअर केला आहे. यामध्ये राहुल गांधी यांच्या लग्नासंदर्भातील संवाद आहे.
आजचा दिवस आमच्यासाठी आठवणीत राहणारा
राहुल गांधी यांनी महिला शेतकऱ्यांशी साधलेल्या संवादाचा व्हीडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी आई सोनिया गांधी, बहिण प्रियांका गांधी आणि माझ्यासाठी आजचा दिवस आठवणीत राहणारा आहे. या खास पाहुण्यांसोबत… सोनीपतच्या महिला शेतकरी भगिनी दिल्ली दर्शनासाठी आल्या. त्यांच्यासोबत घरी मस्त जेवण झालं आणि खूप साऱ्या गप्पा झाल्या, अशा आशयाचे ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. याबरोबर त्यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: