एक्स्प्लोर
ABP C Voter Survey: मोदी, योगी, राहुल गांधी की केजरीवाल... पंतप्रधानपदासाठी जनतेची पसंती कोणाला? सर्वेक्षणाचे आकडे पाहा
ABP C Voter Survey: विरोधी आघाडी 'इंडिया' लोकसभा निवडणुकीत आपल्या विजयाचा दावा करत आहे, तर भाजप पंतप्रधान मोदींच्या नावावर विजयी होईल असं बोललं जात आहे.
ABP C Voter Survey
1/8

दरम्यान, याचसंदर्भात एबीपी न्यूज सी व्होटरचा सर्व्हे समोर आला आहे.
2/8

सर्वेक्षणात प्रश्न विचारण्यात आला होता की, पंतप्रधान पदासाठी पहिली पसंती कोण? यावर बहुतांश लोकांनी सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंच नाव घेतलं. सर्वेक्षणानुसार, 63 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदीच पहिली पसंती असल्याचं सांगितलं आहे.
3/8

सर्वेक्षणात पीएम मोदींनंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नावाला लोकांची पसंती असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये 20 टक्के लोकांनी राहुल गांधी पंतप्रधानपदाची पसंती दिल्याचा दावा केला आहे.
4/8

एबीपी न्यूजसाठी केलेल्या सी-व्होटर सर्वेक्षणात भाजप नेते आणि यूपीचे दोन वेळा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव देखील आहे. सर्वेक्षणात 6 टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधानपदासाठी पसंती असल्याचं सांगितलं आहे.
5/8

सर्वेक्षणात पीएम मोदी, राहुल गांधी आणि योगी आदित्यनाथ यांच्यानंतर लोकांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधानपदासाठी आपली निवड असल्याचं सांगितलं.
6/8

दोन टक्के लोकांनी केजरीवाल आमची पसंती असल्याचं सांगितलं आहे. तसेच, 9 टक्के लोक होते ज्यांनी यापैकी कोणत्याही नेत्याला आपली पसंती दर्शवलेली नाही.
7/8

सर्वेक्षणात दुसरा प्रश्न विचारण्यात आला होता की, जर एखाद्याला पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांची थेट निवड करायची असेल तर तो कोणाला निवडणार? यावर 70 टक्के लोकांनी पीएम मोदींचे नाव घेतले.
8/8

सर्वेक्षणानुसार 25 टक्के लोकांनी राहुल गांधींचे नाव घेतले. त्याचवेळी 50 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांना या दोन्ही नेत्यांपैकी एकाचीही निवड करायची नाही. सर्वेक्षणात 2 टक्के लोकांनी सांगितले की, ते यावर काहीही बोलू इच्छित नाही.
Published at : 28 Jul 2023 10:12 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
क्राईम
पुणे
























