एक्स्प्लोर
मदुराईत जलीकट्टूच्या कार्यक्रमादरम्यान 36 जण जखमी, एकजण अत्यवस्थ
चेन्नई: तामिळनाडूच्या मदुराईमध्ये आयोजित जलीकट्टूच्या कार्यक्रमादरम्यान 36 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यातील एकजण अत्यवस्थ असल्याची माहिती आहे.
मदुराईच्या अवनीपुरममध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी 900 पेक्षा अधिक बैलांचा सहभाग होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन महसूलमंत्री आर.बी.उदयकुमार आणि जिल्हाधिकाऱी वीरराघव राव यांच्या हस्ते झालं. यावेळी जिल्हा प्रशासनासह पोलीस खात्यातील अनेक अधिकारीही उपस्थित होते.
या कार्यक्रमात 700 नागरिकांनी सहभाग घेतला होता. बैलांना नियंत्रित करताना 36 जण जखमी झाले. या जखमींना तत्काळ जवळच उभारण्यात आलेल्या उपचार केंद्रामध्ये दाखल करण्यात आलं आहे. पण यातील एकाची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे समजते.
दरम्यान, जलीकट्टूच्या कार्यक्रमाआधी आवश्यक ती सर्व काळजी घेतल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. यासाठी राज्य सरकारकडून अवश्यक त्या सर्व उपाय योजना केल्या होत्या. या तपासणी केंद्रांमध्ये बैल आणि सहभागी स्पर्धकांचे वैद्यकीय तपासणी करण्यात येत होती.
संबंधित बातम्या
जलीकट्टूसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा तामिळनाडू सरकारला दिलासा
तामिळनाडू सरकारच्या जलीकट्टूच्या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी
VIDEO स्पेशल रिपोर्ट : जलीकट्टूप्रमाणे बैलगाडी शर्यतीला सूट का नाही?
बैलगाडी शर्यतीसाठी अध्यादेश काढू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
बैलगाडी शर्यतीसाठी शिवसेनेचा आवाज
बैलगाडी शर्यतीसाठी टॉवरवर चढून आंदोलन
… तर उद्या वाहनांवरही बंदी आणणार का, कमल हसनचा सवाल
जलीकट्टूला हिंसक वळण, पोलीस ठाणे पेटवले, 150 आंदोलक ताब्यात
जलिकट्टूसाठीचे आंदोलन तीव्र, तीन आंदोलकांचा मृत्यू तर 28 जण जखमी
‘जलिकट्टू’च्या अध्यादेशाला काही बदलांसह केंद्राची मंजुरी
जलीकट्टूसाठी रहमान, अश्विन, विश्वनाथन मैदानात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement