Varun Singh Health Update: 'वरुण फायटर आहे, तो जीवनाची लढाई नक्कीच जिंकेल' ग्रुप कॅप्टनच्या वडिलांचं वक्तव्य
Varun Singh Health Update: वरूण सिंह त्यांच्यावर बेंगळुरूच्या कमांड रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
Varun Singh Health Update: Mi-17V5 हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह 13 जणांनी प्राण गमवावं लागलंय. या दुर्घटनेत केवळ ग्रुप कॅप्टन वरुण सिंह (Varun Singh) वाचले असून त्यांच्यावर बेंगळुरूच्या कमांड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांच्या प्रकृती चिंताजनक आहे. याचदरम्यान, वरूण सिंहच्या वडिलांनी मोठं वक्तव्य केलंय. वरूण फायटर आहे. तो जीवनाची लढाई नक्की जिंकेल, असंही त्यांनी म्हटलंय. तसेच वरुणला मिळणाऱ्या उपचारावर त्यांना पूर्ण विश्वास असल्याचं त्यांनी म्हटलंय.
पीटीआयशी बोलताना वरूण सिंह यांचे वडील असं म्हणाले की, माझा मुलगा फायटर आहे. तो जीवनाची लढाई नक्की जिंकेल. माझ्या मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. यामुळं तो कसा आहे? हे सांगण कठीण आहे, असंही त्यांनी म्हटलंय. त्यांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तसेच्या वरूण यांच्यासाठी संपूर्ण भारतातून प्रार्थना केली जात आहे.
ग्रुप कॅप्टन वरुणला ऑगस्टमध्ये शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतरही त्यांनी गेल्या वर्षी विमानातील मोठा अपघात टाळला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले की, ग्रुप कॅप्टनचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यावेळी ते वेलिंग्टन (तामिळनाडू) येथल मिलिटरी हॉस्पिटलमध्ये लाईफ सपोर्ट सिस्टीमवर होते. Mडी
सीडीएस जनरल बिपीन रावत हे असलेल्या भारतीय हवाईदलाच्या Mi-17V5 हेलिकॉप्टरला कर्नाटक-तामिळनाडू सीमेवरील कुन्नूरजवळ भीषण अपघात झाला होता. या अपघातात रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह एकूण 13 जणांनी प्राण गमावले आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
- Bipin Rawat : शक्तिमान अधिकाऱ्याला देश मुकला...पण देशाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
- Bipin Rawat : हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू, जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम
- Bipin Rawat Helicopter Crash: देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन