एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गोव्यातील कथित राफेल ऑडिओ क्लिप पुन्हा चर्चेत, काँग्रेसची चौकशीची मागणी
दीड महिन्यापूर्वी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची कथित राफेल कराराचीसंदर्भातील ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.
पणजी : केंद्र सरकारतर्फे सुप्रीम कोर्टात राफेल कराराच्या काही फाईल्स गहाळ झाल्याची माहिती दिली. यानंतर गोवा प्रदेश काँग्रेसने गोव्यातील आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या कथित राफेल ऑडिओ क्लिपचा मुद्दा उपस्थित करत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला.
राफेलवर सुप्रीम कोर्टात सरकारचा सेल्फ गोल, कागदपत्र गहाळ झाल्याचा सनसनाटी गौप्यस्फोट
दीड महिन्यापूर्वी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची कथित राफेल करारासंदर्भातील ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यात राणे एका व्यक्तीसोबत बोलताना मंत्रिमंडळ बैठकीचा हवाला देत, मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी राफेलच्या फाईल्स आपल्या बेडरुममध्ये आहे, असं म्हटल्याचं माहिती दिली होती. तोच धागा पकडत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, "ती ऑडिओ क्लिप बनावट असल्याचा दावा आरोग्यमंत्री राणे यांनी केला होता. मात्र विषय गंभीर असूनही त्याबाबत पोलिसात तक्रार झाली नाही किंवा त्यामागील सूत्रधार शोधण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. हे पाहता हा प्रकार संशयास्पद वाटत होता. आता सरकारनेच काही फाईल्स गहाळ झाल्याचं मान्य केलं. त्यामुळे त्या ऑडिओ क्लिपमधील संभाषण खरं तर नाही ना अशी शंका घेण्यास वाव आहे."
राफेल कराराशी निगडित कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून चोरीला : महाधिवक्ता
"माजी संरक्षण मंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी त्या ऑडिओ क्लिपनंतर आपल्याकडे तशा कोणत्याच फाईल्स नाहीत असं म्हटल्याचं ऐकिवात नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्या कथित राफेल ऑडिओ क्लिपची सुमोटो पद्धतीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करायला हवी," असं चोडणकर पुढे म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement