SpiceJet : स्पाइसजेटच्या विमानाचा पुन्हा खोळंबा, दुबई- मदुराई उड्डाणापूर्वी चाकात बिघाड
स्पाईसेटच्या दुबई- मदुराई उड्डाणापूर्वी सोमवारी बोइंग बी 737 विमानचे पुढील चाकामध्ये बिघाड झाल्यामुळे उड्डाण उशीरा झाल्याची माहिती वाहतूक महासंचालनालयाकडून देण्यात आली आहे.
SpiceJet Flight Delayed : गेल्या अनेक दिवसांपासून स्पाइसजेटच्या (SpiceJet Flight) विमानांमध्ये तांत्रिक दोष समोर येत आहेत. त्यामुळे अनेक वेळा विमानांना आपत्कालीन लँडिंग करावे लागले. सोमवारी देखील काही तांत्रिक कारणांमुळे स्पाईसेटच्या दुबई- मदुराई (Dubai-Madurai Flight) या विमानाला उशीर झाला. सोमवारी बोइंग बी 737 विमानचे पुढील चाकामध्ये बिघाड झाल्यामुळे उड्डाण उशीरा झाल्याची माहिती वाहतूक महासंचालनालयाकडून ((DGCA) देण्यात आली आहे.
डीजीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉक अराऊंड दरम्यान इंजिनिअरला नोज व्हील (Nose Wheel) स्ट्रट नेहमीपेक्षा वेगळा दिसला. ही माहिती लगेच इंजिनिअरला देण्यात आली. तर स्पाईसजेटने हे वृत्त फेटाळले आहे. अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
स्पाईसजेटने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, 11 जुलैला स्पाईसजेटच्या दुबई - मदुराई (Dubai-Madurai Flight) SG23 च्या उड्डाणापूर्वी काही तांत्रिर समस्येमुळे उशीर झाला. त्यानंतर पर्यायी विमानाची व्यवस्था केली. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर विमानाने उड्डाण केले. उड्डाणासाठी उशीर कोणत्याही एअरलाईन कंपनीला होऊ शकतो.
गेल्या सात महिन्यात काही तांत्रिक अडचणींमुळे 20 विमानांचे आपत्कालीन लँडिंग कराण्यात आले. त्यामध्ये स्पाईसजेटने 11 वेळा एमर्जन्सी लँडिंग केले आहे. हवामान रडारमध्ये बिघाड, विमानात तांत्रिक बिघाड, विंडशील्डला तडा अशा अनेक कारणांमुळे 2022 साली 20 वेळा विमानांचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. दोन हजारपेक्षा अधिक प्रवाशांना याचा फटका बसला आहे. याध्ये स्पाईसजेटमध्ये सर्वाधिक त्रुटी असल्याचे समोर आले आहे.
संबंधित बातम्या :
भारतीय विमानांचे सात महिन्यात 20 वेळा इमर्जन्सी लॅन्डिंग, प्रवाशांच्या सुरक्षिततेचे काय? या कमतरतेकडे कधी लक्ष देणार?
SpiceJet : स्पाइसजेटच्या विमानात 17 दिवसांत 8 वेळा बिघाड, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून कारणे दाखवा नोटीस