SpiceJet : स्पाइसजेटच्या विमानात 17 दिवसांत 8 वेळा बिघाड, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून कारणे दाखवा नोटीस
SpiceJet : स्पाईसजेटच्या विमानांमधील सततच्या सुरक्षेतील त्रुटीने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. स्पाइसजेटच्या विमानात 17 दिवसांत 8 वेळा बिघाड झाला आहे.
SpiceJet : गेल्या अनेक दिवसांपासून स्पाइस जेटच्या विमानांमध्ये तांत्रिक दोष समोर येत आहेत. त्यामुळे अनेक वेळा विमानांना आपत्कालीन लँडिंग करावे लागले. स्पाइसजेटच्या बोईंग 737 मालवाहू विमानाच्या वेदर रडारने मंगळवारी काम करणे बंद केले. हे विमान कोलकात्याहून चीनमधील चोंगकिंगला जात होते, मात्र हवामान रडारमध्ये बिघाड झाल्याने विमान कोलकात्यात परत पाठवण्यात आले. विमानाने कोलकात्यात सुरक्षित लँडिंग केले.
स्पाइसजेटच्या विमानात तांत्रिक बिघाड होण्याची गेल्या १७ दिवसांतील ही आठवी घटना आहे. मंगळवारी स्पाइसजेटच्या आणखी दोन विमानांमध्ये तांत्रिक त्रुटी समोर आल्या. डीजीसीएने या दोन्ही घटनांचा तपास सुरू केला होता. याशिवाय मागील पाच घटनांचा तपासही सुरू आहे. स्पाईसजेटच्या विमानांमधील सततच्या सुरक्षेतील त्रुटी लक्षात घेऊन नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.
मंगळवारी आणखी दोन घटना घडल्या
मालवाहू विमानाचा अपघात होण्यापूर्वी मंगळवारी स्पाइसजेटच्या दोन विमानांमध्ये दोन अपघात होता होता टळला. पहिल्यांदा दिल्ली-दुबई विमानात घडला. यामध्ये दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाच्या इंडिकेटरमध्ये बिघाड आढळून आला. यानंतर विमानाचे पाकिस्तानातील कराची येथे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.
त्याचवेळी स्पाईसजेटच्या आणखी एका विमानाने मुंबईत प्राधान्यक्रमाने लँडिंग केले. त्याच्या विंडशील्डला तडा गेला होता. DGCA च्या म्हणण्यानुसार, स्पाइसजेटच्या Q-400 विमानाच्या विंडशील्डमध्ये 23 हजार फूट उंचीवर तडा गेला होता. यानंतर कांडला-मुंबई विमान तातडीने मुंबई विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला.
दिल्ली-जबलपूर विमानातून धूर निघू लागला
याआधी शनिवारी (२ जुलै) दिल्लीहून जबलपूरला जाणारे स्पाइसजेटचे फ्लाइट क्रमांक एसजी-२९६२ दिल्लीत उतरवण्यात आले. दिल्ली-जबलपूर विमानाच्या केबिनमध्ये धूर दिसू लागला तेव्हा विमान 5000 फूट उंचीवर होते. या विमानाने सकाळी 6.15 वाजता दिल्ली विमानतळावरून उड्डाण केले. काही मिनिटांतच विमानात धुराचे लोट भरू लागले.
पाटण्यातही अशीच घटना घडली.
19 जून रोजी पाटण्यातही स्पाईसजेट विमानाच्या डाव्या पंखातून टेकऑफच्या वेळी ठिणग्या निघू लागल्या. यानंतर पाटण्यातच त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. प्राथमिक तपासात बर्ड हिटची घटना समोर आली आहे. विमानात 185 प्रवासी होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या