एक्स्प्लोर
सीतेला कोणी पळवलं? गुजरात बोर्डाच्या पुस्तकात मोठी चूक
ज्यावरुन रामायण घडलं, त्यातील मुख्य बाबच गुजरात बोर्डाने चुकवल्याने, त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे.
गांधीनगर: सीतेला कोणी पळवलं? या सोप्या प्रश्नाचं उत्तर लहान मूलही अचूक देईल, असं म्हटलं जातं.
मात्र या सोप्या प्रश्नाचं उत्तर गुजरातच्या बारावीच्या संस्कृत पुस्तकात चुकवण्यात आलं आहे. सीतेला रामाने पळवलं, असं या पुस्तकात छापण्यात आलं आहे.
ज्यावरुन रामायण घडलं, त्यातील मुख्य बाबच गुजरात बोर्डाने चुकवल्याने, त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे.
सीतेला रावणाने पळवलं हे पूर्वापार ऐकत-वाचत आलेलो आहे. मात्र गुजरात बोर्डाच्या बारावीच्या संस्कृतच्या पुस्तकात सीतेला चक्क प्रभू रामाने पळवल्याचं म्हटलं आहे.
या पुस्तकातील 106 नंबरच्या पानावर याबाबतचा उल्लेख आहे. “संस्कृत साहित्याची ओळख” यामध्ये अनेक चुका आहेत.
“रामाचे विचार कवीने अत्यंत उत्तमरित्या मांडले आहेत. सीतेला जेव्हा रामाने पळवलं, तेव्हा लक्ष्मणाने रामाला दिलेल्या हृदयस्पर्शी संदेशाचं वर्णन केलं आहे” असं या पुस्तकात म्हटलं आहे.
दरम्यान, ही भाषांतर चूक असून रावणाऐवजी चुकून राम झाल्याचं स्पष्टीकरण गुजरात बोर्डाने दिलं आहे.
राजस्थान बोर्डाचीही चूक
काही दिवसांपूर्वी राजस्थान बोर्डानेही अशीच चूक केल्याचं उघड झालं होतं.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे ‘दहशतवादाचे जनक’ आहेत, असे राजस्थानमधील आठवी इयत्तेच्या समाजशास्त्र विषयाच्या पुस्तकांमध्ये छापण्यात आले आहे.
राजस्थान माध्यमिक शिक्षण मंडळाच्या खासगी इंग्रजी माध्यमिक शाळेने मुथरेतील प्रकाशाकडून हे पुस्तक छापून घेतले आहेत. त्यात पान क्रमांक 267 वरील 22 व्या प्रकरणात "Tilak demonstrated a path towards national movement, therefore, he is called as the father of terrorism" असे म्हटले आहे.
संबंधित बातमी
राजस्थानच्या शिक्षण विभागाचं ‘डोकं ठिकाणावर आहे का?’
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement