(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महंत नृत्य गोपाळ दास कोरोना पॉझिटिव्ह, राम मंदिराच्या भूमिपूजनाला पंतप्रधानांसोबत हजेरी
Ram Mandir Trust Head Nitya Gopal Das Corona Positive : श्रीराम जन्मभूमी तिर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाळ दास यांची तब्येत बिघडली असून त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
मथुरा : श्रीराम जन्मभूमी तिर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाळ दास यांची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यांना उपचारासाठी गुरुग्राम येथील मेदांचा रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. महंत नृत्य गोपाळ दास मथुरा येथून निघाले असून ते लवकरच मेदांचा रुग्णालयात पोहोचणार आहेत. ते मथुरामधील जन्माष्ठमीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. गुरुवारी सकाळी अचानक त्यांची तब्येत बिघडली. नृत्य गोपाळ दास यांना कोरोनाची लागण झाल्याची शंका उपस्थित करण्यात येत होती. त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.
नृत्य गोपाळ दास यांना श्वास घेण्यास त्रास : सूत्र
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महंत नृत्य गोपाळ दास यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. सध्या त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला आहे. डॉक्टरांची टीम सतत त्यांच्या आरोग्यावर नजर ठेवून आहे. असं सांगितलं जात होतं की, अद्याप त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल आलेला नाही. कोरोनाचा अहवाल आल्यानंतरच त्यांना कोरोनाची लागण झाली आहे की, नाही? याबाबत स्पष्ट होईल. परंतु आता त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याचं सांगितलं जात आहे.
राम मंदिर भूमिपूजनाच्या दिवशी मोदींसोबत मंचावर होते उपस्थित
महंत नृत्य गोपाळ दास राम जन्मभूमी पूजन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकाच मंचावर उपस्थित होते. श्रीराम जन्मभूमी तिर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास श्रीकृष्ण जन्मभूमी न्यासचे अध्यक्षही आहेत. जन्माष्टमी निमित्त बुधवारी रात्री ते कार्यक्रमात सहभागी झाले होते. गोपाळ दास दरवर्षी या कार्यक्रमात सहभागी होतात. यंदाच्या वर्षी ते बाळ गोपाळाच्या अभिषेकासाठी अयोध्येहून पवित्र शरयू जलही घेऊन आले होते.
सीएमने डीएमसोबत केली चर्चा
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, सीएम योगी आदित्यनाथ यांनी महंत नृत्य गोपाळ दास यांच्या आरोग्याबाबत माहिती घेतली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी मथुराच्या जिल्हाधिकारी आणि मेदांता रुग्णालयातील डॉक्टर त्रेहान यांच्यासोबत चर्चाही केली.
महत्त्वाच्या बातम्या :