Amit shah Corona Positive | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोरोनाची लागण झाली आहे. अमित शाह यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली.
![Amit shah Corona Positive | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण Amit Shah tests Corona Positive Union Home Minister COVID-19 Positive Amit shah Corona Positive | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/14034915/amit-shah-final.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोरोनाची लागण झाली आहे. अमित शाह यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली. त्यांना दिल्लीतील मेदांता रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. अमित शाह यांनी ट्वीट करत म्हटलं की, "कोरोनाची लक्षणं दिसू लागल्याने मी कोविड 19 टेस्ट केली. यामध्ये माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी तब्येत ठीक आहे, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात भरती होत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात जे लोक आले होते, त्यांनी कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी."
कोरोना के शुरूआती लक्षण दिखने पर मैंने टेस्ट करवाया और रिपोर्ट पॉजिटिव आई है। मेरी तबीयत ठीक है परन्तु डॉक्टर्स की सलाह पर अस्पताल में भर्ती हो रहा हूँ। मेरा अनुरोध है कि आप में से जो भी लोग गत कुछ दिनों में मेरे संपर्क में आयें हैं, कृपया स्वयं को आइसोलेट कर अपनी जाँच करवाएं।
— Amit Shah (@AmitShah) August 2, 2020
येत्या 5 ऑगस्ट रोजी राममंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह सहभागी होणार होते. मात्र आज त्यांचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ते आता राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)