एक्स्प्लोर

iPhone 13 : गेहलोत सरकारकडून सर्व 200 आमदारांना iPhone 13 भेट, 'हे' आहे कारण?

Rajsthan MLA iPhone 13 Gift : राजस्थान सरकारने बुधवारी विधानसभेत आपल्या सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी राज्य सरकारकडून सर्व 200 आमदारांना iPhone 13 भेट म्हणून देण्यात आला.

Rajsthan MLA iPhone 13 Gift : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी 23 फेब्रुवारी (राजस्थान अर्थसंकल्प 2022-23) विधानसभेत राजस्थानचा 2022-23 चा अर्थसंकल्प सादर केला. राजस्थानमध्ये अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दरवेळीप्रमाणेच आमदारांना महागड्या भेटवस्तू देण्यात आल्या. राजस्थानचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सर्व 200 आमदारांना Apple iPhone 13 देण्यात आला. आमदारांना सुमारे 75 हजार ते एक लाख रुपये किमतीचे आयफोन 13 देण्यात आले आहेत.

सरकारने इतके आयफोन मागवले
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान सरकारने नुकतेच 250 iPhone खरेदी केले आहेत. त्यापैकी 200 आयफोन विधानसभा सदस्यांना देण्यात येणार आहेत. हा फोन आमदारांना देण्यापूर्वी विधानसभेचे अ‍ॅपही अपग्रेड करण्यात आले आहे. राज्य सरकार आमदारांना एवढी महागडी भेट देण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अर्थसंकल्पात आमदारांना अनेक महागड्या भेटवस्तू देण्यात आल्या आहेत.

साधारणत: अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आमदार बाहेर पडतात तेव्हा त्यांना अर्थसंकल्पाची प्रत ब्रीफकेसमध्ये दिली जाते. पण यावेळी स्मार्ट लेदर ब्रीफकेसमध्ये अर्थसंकल्पाची प्रतसह नवीन आयफोन 13 देण्यात आला. iPhone 13 ची किंमत 75,000 ते 1 लाख दरम्यान आहे. या भेटीसाठी राज्याला सुमारे दीड कोटी रुपये खर्च करावे लागले. या भेटवस्तूमुळे बहुतांश आमदार कोणत्याही पक्षाचे असोत, आनंदी होते.

भाजप आमदारांचा फोन स्वीकारण्यास नकार
मात्र दरम्यान, राजस्थानच्या भाजप आमदारांनी ही भेट नाकारली आहे. वास्तविक, राजस्थान भाजपचे अध्यक्ष सतीश पुनिया यांनी ट्विट केले की, गुलाब कटारिया, राजेंद्र राठौर आणि इतर आमदारांशी चर्चा केल्यानंतर, राज्य सरकारवर पडणारा आर्थिक बोजा लक्षात घेऊन राजस्थान सरकारमधील सर्व भाजप आमदारांनी दिलेले आयफोन परत करतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. 

एक कोटी 33 लाख महिलांना स्मार्ट फोन देण्याचे आश्वासन
राजस्थान सरकारने अर्थसंकल्पात राज्यातील एक कोटी 33 लाख महिलांना स्मार्ट फोन देण्याचा निर्णयही घेतला आहे. हे मोबाईल मुख्यमंत्री डिजिटल सेवा योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत. एक कोटी 33 लाख चिरंजीवी कुटुंबातील महिला प्रमुखांना तीन वर्षांची इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेले हे मोबाईल दिले जातील.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget